प्रवाशांनो सावधान! तीन वर्षांत इतक्या हजार स्मार्टफोनवर डल्ला, ठाणे ते ऐरोली परिसरात चोरट्यांसाठी कुरण
Thane Airoli Station Mobile Theft case increases : ठाणे परिसरासह दिवा, ऐरोलीपर्यंत प्रवास करताय का? तर मग या प्रवासात सावध राहा. कारण या रेल्वे मार्गावर सर्वाधिक मोबाईल चोरी गेल्याचे समोर आले आहे. तेव्हा राहा सावध, होऊन नका सावज, तुमच्या निष्काळजीपणावर चोरटे मज्जा मारताय हे विसरू नका.
ठाण्यातील प्रवाशांच्या जीवावर मोबाईल चोरटे मज्जा मारताय, असं म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण प्रवाशांच्या निष्काळजीपणामुळे मोबाईल चोरट्यांचं नशीब फळफळलं आहे. ठाणे ते दिवा, ऐरोली या प्रवासादरम्यान खिसा कापण्याच्या नाही तर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. याविषयीची आकडेवारी धक्कादायक आहे. ही आकडेवारी पाहीली तरी प्रवाशांचा निष्काळजीपणा समोर येईल. या रेल्वे मार्गावर सर्वाधिक मोबाईल चोरी गेल्याचे समोर आले आहे. तेव्हा राहा सावध, होऊन नका सावज, तुमच्या निष्काळजीपणावर चोरटे मज्जा मारताय हे विसरू नका.
4000 मोबाईलची चोरी
प्रवाशांचा निष्काळजीपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. ठाणे ते दिवा ऐरोली रेल्वे स्थानकात चोऱ्या वाढल्या आहेत. 3 वर्षात 4000 मोबाईलची चोरी गेल्याचे समोर आले आहे. मोबाईल चोरीला गेल्यावर त्याची अनेक जण फिर्याद देतात. तर काही जण काहीच फायदा होणार नाही म्हणून साधी तक्रार सुद्धा दाखल करत नाहीत. पण ही आकडेवारी धक्कादायक आहे. वर्षाला सरासरी हजार मोबाईल चोरीला गेल्याचे समोर येत आहे. या परिसरात चोरांचा सुळसुळाट असल्याचे समोर येत आहे.
इतक्या प्रकरणाचा उलगडा
ठाणे ते आसपासच्या परिसरात 3 वर्षात 4000 मोबाईलची चोरी गेल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्थानक परिसरातील चोरट्यांचा सुळसुळाट आणि प्रवाशांचा निष्काळजीपणा यामुळे मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहेत. तर 1 हजार 494 प्रकरणाचा उलगडा करणे पोलीसांना शक्य झाले आहे.
खासगी बस, टीमटी, रिक्षा प्रवासी लक्ष्य
रेल्वेत गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे मोबाईल लांबवण्यात येतात. अनेक प्रवाशी मागील खिशात मोबाईल ठेवतात, अथवा हातात तो निष्काळजीपणे धरलेला असतो. असे प्रवासी चोरट्यांचे सहज लक्ष्य होतात. रेल्वे प्रवाशांसोबतच गर्दीची ठिकाणे, टीएमटी बसेस, रिक्षा स्टॉप याठिकाणी सुद्धा चोरटे तुमच्यावर पाळत ठेऊन असतात. महागड्या मोबाईलवर अधिक लक्ष असते. मोबाईल चोरीच्या असंख्य तक्रारी विविध पोलीस ठाण्यात समोर आल्या आहेत. तेव्हा सार्वजनिक ठिकाणी वावरताना निष्काळजीपणाचा तुम्हाला फटका बसू शकतो.