Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बसस्थानक परिसरात मोबाईल चोर चोरी करण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात एका प्रवाशाची नजर गेली आणि…

गर्दीत स्वतःचे सामान सांभाळून ठेवा. असं बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी जाहीर सांगितलं जातं. पण, यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात.

बसस्थानक परिसरात मोबाईल चोर चोरी करण्याच्या तयारीत होता, तेवढ्यात एका प्रवाशाची नजर गेली आणि...
Follow us
| Updated on: Apr 10, 2023 | 12:44 PM

ठाणे : गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोकं असतात. कुणी कामात असल्याने घाईत असतात. तर कुणी घाईतील व्यक्तींवर नजर ठेवणारे असतात. अशा गर्दीत स्वतःचे सामान सांभाळून ठेवा. असं बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी जाहीर सांगितलं जातं. पण, यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात. पण, असे चोर सापडल्यास त्यांची काही खैर राहत नाही. अशी घटना भिवंडी बसस्थानक परिसरात घडली.

भिवंडी बस आगार परिसरातील घटना

गर्दीत काही चोरटे सक्रिय असतात. हातचलाखी करून ते कुणाचा मोबाईल तर कुणाच्या इतर वस्तू चोरून नेतात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशीच एक घटना भिवंडी बस आगार परिसरात घडली. या ठिकाणी सकाळी चाकरमान्यांची कार्यालयात जाण्यासाठी गर्दी असते. या गर्दीचा काही चोर गैरफायदा घेतात.

chor 2 n

हे सुद्धा वाचा

भुरट्या चोरट्यास रंगेहाथ पकडले

सकाळच्या वेळी चाकरमान्यांची भिवंडी बस आगारात प्रवासासाठी गर्दी होत असते. त्यावेळी भुरटे चोर अशा गर्दीत हातसफाई करण्यासाठी शिरतात. भिवंडी बस आगारात अशाच पद्धतीने एक चोर गर्दीत शिरला. हातसफाई करून मोबाईल चोरी करणाऱ्याचा प्रयत्न करत होता. या भुरट्या चोरट्यास सतर्क असलेल्या प्रवाशाने रंगेहाथ पकडले.

मोबाईल चोरट्याची केली धुलाई

मग त्यानंतर अनेकांनी मोबाईल चोराची यथेच्छ धुलाई केली. चोरास बस स्थानकातील हिरकणी कक्ष या ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर स्थानिक निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होताच त्यांनी चोरट्यास ताब्यात घेतले. तोपर्यंत प्रवाशांनी आपले हात साफ केले होते. चोर तोडं लपवून पळत होतो.

या चोरट्याला जमावाने चांगलेच बदडले. यानंतर याने चोरी करू नये, अशी धुलाई केली. पण, चोर शेवटी चोरच. त्यांना याची सवय झालेली असते. त्यामुळे काही वाटत नाही. काही दिवस जेलमध्ये काढू नंतर परत येऊ. इतपर्यंत त्यांची मजल गेली असते. त्यामुळे प्रवाशांनी आपले सामान जपून ठेवणे एवढाच पर्याच उरतो. पोलीस शेवटी कुठपर्यंत मदत करणार?

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.