ठाणे : गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोकं असतात. कुणी कामात असल्याने घाईत असतात. तर कुणी घाईतील व्यक्तींवर नजर ठेवणारे असतात. अशा गर्दीत स्वतःचे सामान सांभाळून ठेवा. असं बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी जाहीर सांगितलं जातं. पण, यातूनही काही चोरटे सावज हेरून चोऱ्या करत असतात. पण, असे चोर सापडल्यास त्यांची काही खैर राहत नाही. अशी घटना भिवंडी बसस्थानक परिसरात घडली.
गर्दीत काही चोरटे सक्रिय असतात. हातचलाखी करून ते कुणाचा मोबाईल तर कुणाच्या इतर वस्तू चोरून नेतात. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. अशीच एक घटना भिवंडी बस आगार परिसरात घडली. या ठिकाणी सकाळी चाकरमान्यांची कार्यालयात जाण्यासाठी गर्दी असते. या गर्दीचा काही चोर गैरफायदा घेतात.
सकाळच्या वेळी चाकरमान्यांची भिवंडी बस आगारात प्रवासासाठी गर्दी होत असते. त्यावेळी भुरटे चोर अशा गर्दीत हातसफाई करण्यासाठी शिरतात. भिवंडी बस आगारात अशाच पद्धतीने एक चोर गर्दीत शिरला. हातसफाई करून मोबाईल चोरी करणाऱ्याचा प्रयत्न करत होता. या भुरट्या चोरट्यास सतर्क असलेल्या प्रवाशाने रंगेहाथ पकडले.
मग त्यानंतर अनेकांनी मोबाईल चोराची यथेच्छ धुलाई केली. चोरास बस स्थानकातील हिरकणी कक्ष या ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर स्थानिक निजामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस दाखल होताच त्यांनी चोरट्यास ताब्यात घेतले. तोपर्यंत प्रवाशांनी आपले हात साफ केले होते. चोर तोडं लपवून पळत होतो.
या चोरट्याला जमावाने चांगलेच बदडले. यानंतर याने चोरी करू नये, अशी धुलाई केली. पण, चोर शेवटी चोरच. त्यांना याची सवय झालेली असते. त्यामुळे काही वाटत नाही. काही दिवस जेलमध्ये काढू नंतर परत येऊ. इतपर्यंत त्यांची मजल गेली असते. त्यामुळे प्रवाशांनी आपले सामान जपून ठेवणे एवढाच पर्याच उरतो. पोलीस शेवटी कुठपर्यंत मदत करणार?