“राजू पाटील केवळ पाहणी आमदार,” रस्त्याच्या निधीमंजुरीवरुन शिवसेना-मनसे आमनेसामने
मनसे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ठाणे : मनसे आमदार राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या दहा पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत मनसेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रस्त्याचा निधी मंजूर करण्यात आलेल्या कागदपत्रवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव खोडून काढले आहे. हा अन्याय आहे, असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तसेच यावेळी आम्ही मनसेच्या आमदाराला फक्त इशारा देत आहोत. पुढच्या वेळी कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (MP Shrikant Shinde name erased by MNS from document approving road fund alleges Shivsena)
पत्रवरील खासदारांच्या नावाचा उल्लेख खोडण्यात आला
कल्याण-शीळ रस्त्याची मनसे आमदार राजू पाटील यांनी नुकतीच पाहणी केली. या पाहणीदरम्यान मनसे आमदारांनी शिवेसना श्रीकांत शिंदे यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली. निधी मंजूर केला. काम कधी सुरु होणार ? असा सवाल राजू पाटील यांनी शिंदे यांना विचारला होता. त्यानंतर आता येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजू पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्यूत्तर दिले. “राजू पाटील हे केवळ पाहणी आमदार आहेत. त्यांचे नाव पाहणी आमदारच ठेवले पाहिजे. मानपाडा रस्त्याची मंजुरी जीपीडब्ल्यूडीने दिलेली आहे. त्या मंजुरी पत्रवर खासदार आणि मनसे आमदार या दोघांची नावे होती. या पत्रवरील खासदारांच्या नावाचा उल्लेख खोडण्यात आला आहे. केवळ स्वत:चे नाव ठेवून आमदार तेच पत्र सोशल मीडियात फिरवित आहेत, असा आरोप यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच यावेळी आम्ही फक्त इशारा देत आहोत. नंतर कारवाई करु, असा सज्जड दम शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिला.
राजू पाटील हे केवळ पाहणी आमदार
शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, युवा सेना नेते दीपेश म्हात्रे, शहर प्रमुख राजेश मोर, राजेश कदम, योगेश म्हात्रे प्रकाश म्हात्रे एकनाथ पाटील यांच्यासह दहा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित केली होती. तर दुसरीकडे युवा सेना नेते दीपेश म्हात्रे यांनी या राजू पाटील यांचे नाव न घेता. त्याचे नाव पाहणी आमदार ठेवले पाहिजे. हे फक्त पाहणी करतात असा टोला लगावला.
पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या कामांची माहिती द्यावी लागते
शिवसेनेने केलेल्या या आरोपानंतर मनसेने प्रतिक्रिया दिली आहे. जे वैयक्तिक मतं मांडतात. आज 25 वर्षे झाली यांच्याकडे सत्ता आहे. आजही सत्ताधारी पक्षाला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी केलेल्या कामांची माहिती द्यावी लागते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असा टोला मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी लगावला.
इतर बातम्या :
Video | ‘खाकी वर्दीची झाकी,’ डोळ्याला चस्मा लावून पोलिसाचा धडाकेबाज डान्स, व्हिडीओ एकदा पाहाच !
मोठी बातमी ! राज्यातील शाळा 17 ऑगस्टपासून सुरु होणार, वर्षा गायकवाड यांची माहिती
उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या सभापतींना धमकीचे पत्र, शिवसैनिक आक्रमक
(MP Shrikant Shinde name erased by MNS from document approving road fund alleges Shivsena)