पथदिव्यांचा दिवसा ‘उजेड’ पाडाल तर वीज तोडू, महावितरणचा ग्रामपंचायतींना इशारा
दिवसा पथदिवे सुरू आढळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे.
दिवसा पथदिवे सुरू असल्याचे आढळल्यास विज लाईन तोडली जाईल संबंधित इशारा महावितरणने दिला आहे. त्यामुळे दिवसभर ‘उजेड’ पाडणाऱ्या ग्रामपंचायतींना चांगलाच चाप बसणार आहे. महावितरणाने काही ठिकाणी पाहणी केली असता विनाकारण दिवसा पथदिवे चालू असल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे महावितरणाने ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीज तोडण्याचा ग्रामपंचायतींना इशारा दिला आहे.
ठरावीक वेळेत पथदिवे चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा किंवा या कामासाठी आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था नसल्यास ग्रामपंचायतींचे पथदिवे दिवसाही सुरू राहतात. ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांच्या वीज बिलाची जबाबदारी ग्रामपंचायतींकडे असते. महावितरणकडून स्वतंत्र वीजवाहिनीद्वारे पथदिव्यांसाठी जोडणी देण्यात येते. दिवसा दिवे सुरू राहिल्याने विनाकारण विजेचा अपव्यय व पर्यायाने संबंधित ग्रामपंचायतीचेही नुकसान होते. ते टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनी पथदिवे ठरावीक वेळेत चालू-बंद करण्याची स्वंयचलित यंत्रणा बसवावी किंवा मनुष्यबळाची व्यवस्था करावी. यापुढे दिवसा पथदिवे सुरू आढळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांची वीजजोडणी खंडित करण्यात येणार आहे.
विजेचा गैरवापर
गरज नसातानाही असे दिवसभार विजेच्या खांब्यावरचे दिवे दिवसभर चालू राहिल्याने विजेचा अपव्यय होतो. त्याचा कुठेतरी विनाकारण गैरवापर होतोय त्यावर आळा घालणं गरजेचं आहे. स्वयंचलित यंत्रणा नसल्याने काही भागातील दिवे हे दिवसभर चालू राहतात. महावितरणाच्या ह्या निर्णयाने आता त्यावर आळा बसेल.
3 कोटी 70 लाख थकबाकी
कल्याण परिमंडलात ग्रामपंचायत पथदिव्यांच्या वीजजोडण्यांची संख्या जवळपास 1553 आहे. पथदिव्यांच्या जोडण्यांचे 3 कोटी 70 लाख रुपये थकीत आहेत.