Kalyan Youth Rescue : कल्याणचा मुनव्वर ‘रमजान’मध्येच परतला! भारत सरकारच्या शिष्टाईनं सात भारतीयांची सुटका

येमेनचे हौती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यात संघर्ष असून त्यातूनच तुम्ही आमच्या शत्रूंना मदत करत असल्याचा आरोप येमेनच्या बंडखोरांनी या जहाजाच्या कर्मचाऱ्यांवर केला. या जहाजावर 11 कर्मचारी होते, त्यापैकी 7 भारतीय खलाशांसह फिलिपाईन्सचा कॅप्टन, म्यानमारचा चीफ इंजिनिअर, इंडोनेशियाचा चीफ ऑफिसर, इथिओपियाचा सेकंड ऑफिसर यांचा समावेश होता.

Kalyan Youth Rescue : कल्याणचा मुनव्वर 'रमजान'मध्येच परतला! भारत सरकारच्या शिष्टाईनं सात भारतीयांची सुटका
कल्याणचा मुनव्वर 'रमजान'मध्येच परतला!Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 1:29 AM

कल्याण : मध्य आशियातल्या येमेनमध्ये साडेतीन महिन्यांपूर्वी एक मालवाहू जहाज हायजॅक (Highjacked) करण्यात आलं होतं. या जहाजावर अडकून पडलेल्या 7 भारतीयांची भारत सरकारच्या शिष्टाईनं नुकतीच सुटका (Rescued) करण्यात आली. यापैकीच एक असलेला कल्याणचा मोहम्मद मुनव्वर हा रमजानच्या पवित्र महिन्यात घरी परतला, अन् त्याच्या कुटुंबीयांनी ईदपूर्वीच ईद साजरी केली. कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात मोहम्मद मुनव्वर हा तरुण आई आणि बहिणीसोबत वास्तव्याला आहे. 2021 पासून मोहम्मद हा आखाती देशातल्या मालवाहू जहाजावर काम करतो. त्यांचं जहाज साडेतीन महिन्यांपूर्वी माल घेऊन सौदी अरेबियाला जात असताना वाटेत येमेनच्या बंडखोरांनी हे जहाज हायजॅक केलं आणि पोर्ट सलीफ या बंदरावर घेऊन गेले. (Munawwar, who was held captive by Yemeni rebels, has returned in kalyan safely)

येमेन आणि सौदी अरेबियाच्या संघर्षातून जहाज हायजॅक

येमेनचे हौती बंडखोर आणि सौदी अरेबिया यांच्यात संघर्ष असून त्यातूनच तुम्ही आमच्या शत्रूंना मदत करत असल्याचा आरोप येमेनच्या बंडखोरांनी या जहाजाच्या कर्मचाऱ्यांवर केला. या जहाजावर 11 कर्मचारी होते, त्यापैकी 7 भारतीय खलाशांसह फिलिपाईन्सचा कॅप्टन, म्यानमारचा चीफ इंजिनिअर, इंडोनेशियाचा चीफ ऑफिसर, इथिओपियाचा सेकंड ऑफिसर यांचा समावेश होता. यानंतर या सर्वांना वाटाघाटी करण्यासाठी साडेतीन महिने तिथेच थांबवून ठेवण्यात आलं. सुदैवानं त्यांचा कोणत्याही प्रकारचा छळ करण्यात आला नाही. यादरम्यान मुनव्वर यानं आपल्या घरी याबाबत कळवल्यानंतर त्याच्या घरच्यांनी भारतीय दूतावसाशी संपर्क साधला आणि या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर भारतीय दूतावासाच्या शिष्टाईनं अखेर सर्व भारतीय कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

अखेर रमजानमध्ये मुनव्वरची सुटका

गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंडखोरांच्या ताब्यात असलेला मुनव्वर नेमका कधी परततो, याकडे त्याच्या कुटुंबीयांचं लक्ष लागलं होतं. त्याच्या काळजीनं आई आणि बहीण यांची अवस्था बिकट झाली होती. मात्र अखेर मुनव्वर रमजानच्या पवित्र महिन्यात त्याच्या घरी परतला. त्यामुळं त्याच्या घरी ईद पूर्वीच ईद साजरी झालीये. (Munawwar, who was held captive by Yemeni rebels, has returned in kalyan safely)

हे सुद्धा वाचा

Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....