Dombivali Crime : डोंबिवलीतील दहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर अनधिकृत इमारत जमीनदोस्त करणार

या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने सदर इमारत ही बेकायदा असल्याचे घोषित केले आहे. या इमारती संदर्भात वेळोवेळी बिल्डरला नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या 21 तारखेला ही इमारत पाडण्यात येईल अशी माहिती केडीएमसीचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे.

Dombivali Crime : डोंबिवलीतील दहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर अनधिकृत इमारत जमीनदोस्त करणार
डोंबिवलीतील दहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर तीन अनधिकृत इमारती जमीनदोस्त करणार
Follow us
| Updated on: Jan 19, 2022 | 4:29 PM

डोंबिवली : लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दहा वर्षीय मुलाच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सदर आठ मजली इमारत ही बेकायदा असल्याचे समोर आले आहे. महापालिकेकडून 21 जानेवारी रोजी या इमारतीवर कारवाईचा हातोडा चालविला जाणार आहे. तसेच मुलाच्या मृत्यू प्रकरणी बिल्डरच्या विरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू

डोंबिवली पूर्व भागातील सागाव परिसरात एका दुकानात काम करणारे राजकुमार मोर्या यांचा एकुलता एक मुलगा सत्यम मंगळवारी सांयकाळी खेळण्यास गेला. तो परतला नाही. तीन तासाच्या शोधानंतर त्याचा मृतदेह परिसरात बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत सापडला. आठ मजली इमारतीच्या लिफ्टकरीता तयार करण्यात आलेल्या खड्यात पाणी साचले होते. त्याच पाण्यात बुडून सत्यम याचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. हे ऐकून त्याच्या आई वडिलांना जबर मानसिक धसका बसला आहे. त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आाहेत.

दोन दिवसांनी इमारत पाडण्यात येणार

या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने सदर इमारत ही बेकायदा असल्याचे घोषित केले आहे. या इमारती संदर्भात वेळोवेळी बिल्डरला नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. येत्या 21 तारखेला ही इमारत पाडण्यात येईल अशी माहिती केडीएमसीचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली आहे. सत्यमच्या मृत्यूला जबाबदार धरत डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. निष्काळजी केल्या प्रकरणी बिल्डरच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल असे मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ट पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. (Municipal Corporation will demolish three unauthorized buildings in the case of death of a ten-year-old boy in Dombivali)

इतर बातम्या

Pune |आनंदाची बातमी! 4 वर्षांचा डुग्गू आज अखेर सापडला ; आठवड्यापासून पोलीस घेत होते शोध

Pune crime |अपहरणाची माहिती सांगण्यासाठी मागितली 2 लाखांच्या खंडणी; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.