Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात सुकन्या आव्हाड ही महिला अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं पहिल्या पतीच्या तीन मुलांसोबत ती अनिलसोबत राहात होती.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
उल्हासनगरात लाथाबुक्क्यांनी मारून लिव्ह इन पार्टनरकडून महिलेची हत्या
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 5:19 PM

उल्हासनगर : लिव्ह इन रिलेशनशिपमधील पार्टनरनेच लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करत महिलेची हत्या केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. सुकन्या आव्हाड असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर अनिल भातसोडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर एका पुरुषासोबत ही महिला लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship)मध्ये राहात होती. याच पुरुषाने तिला मारहाण करत तिची हत्या केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अनिल हा 12 मार्चपासून फरार झाला असून पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. (Murder of a woman by a live-in partner in Ulhasnagar)

महिला लग्न करण्यास तयार नसल्याने केली मारहाण

उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात सुकन्या आव्हाड ही महिला अनिल भातसोडे याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाल्यानं पहिल्या पतीच्या तीन मुलांसोबत ती अनिलसोबत राहात होती. अनिल हा तिच्याशी लग्न करण्याची मागणी करत होता. मात्र तो खूप दारू पीत असल्याने सुकन्या लग्नासाठी तयार नव्हती. दारू सोड, मगच लग्न करेन अशी अट सुकन्याने घातल्याने त्यांच्यात वाद होत होते. त्यातच 12 मार्च रोजी अनिल याने सुकन्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचं डोकं भिंतीवर आपटलं. यावेळी मुलगी आकांक्षा हिने आईची सुटका केली.

मात्र या मारहाणीत जखमी झाल्याने सुकन्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 15 मार्च रोजी सुकन्याचा घरातच मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलगी आकांक्षा हिने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनिल भातसोडे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

मेळघाटात शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

अमरावती जिल्ह्यातील धारणीपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात अनोळखी अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने या महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा आरोप होत असून पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलिस पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Murder of a woman by a live-in partner in Ulhasnagar)

इतर बातम्या

कल्याणमध्ये कॉन्ट्रॅक्टर हल्ला प्रकरण, व्यवसायिक वादातून दिली सुपारी, सहा आरोपी ताब्यात

Nashik News | नाशिकमध्ये दोन अपघातात 1 ठार; 2 गंभीर जखमी, treatment सुरू

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.