Thane Youth Murder : मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या, तीन आरोपी अटक तर दोघे फरार

| Updated on: Mar 16, 2022 | 9:42 PM

ठाण्यातील लोकमान्यनगर येथे मोबाईल चार्जिंगवरून साहिल आणि अभिषेक यांच्यात आपापसात वाद झाला होता. हा वाद नेमका काय हे जाणून घ्यायला सुमित गेला असता, साहिल आणि अभिषेक यांना सुमितचा राग आला. याच रागातून त्यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने धारदार शास्त्राने वार करत सुमित राऊत याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

Thane Youth Murder : मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या, तीन आरोपी अटक तर दोघे फरार
मोबाईल चार्जिंगवरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या
Follow us on

ठाणे : क्षुल्लक कारणावरुन तरुणांमध्ये भांडण होऊन मग त्याचे रूपांतर हत्येमध्ये झाल्याचे प्रकार सध्या सर्रास समोर येत आहेत. असाच प्रकार ठाण्यातील वर्तकनगर परिसरात घडला आहे. मोबाईल चार्जिंग (Mobile Charging)वरुन झालेल्या भांडणात एका तरुणाची हत्या (Murder) झाली असून यामध्ये तीन युवकांना अटक करण्यात आली आहे. रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे तरुणांकडून अशा प्रकारचे गुन्हे घडण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पालकांची व पोलिसांची चिंता वाढली आहे. तरुणपणीचे सळसळते रक्त, त्यात रागावर नियंत्रण नाही आणि याचा परिणाम मग हातून कोणता तरी गुन्हा घडतोय. याला जबाबदार मग मित्र परिवार किंवा ज्यादा इंटरनेटचा वापर त्यात प्रामुख्याने पबजी सारखे गेम यामुळे तरुण रागीट बनत आहेत. याच रागाच्या परिणामामध्ये एका तरुणाची हत्या झाली आहे. (Murder of a young man in a brawl over mobile charging, Three accused arrested while two absconding)

दोन मित्रांच्या वादाबाबत विचारणा केल्याने तरुणाची हत्या

ठाण्यातील लोकमान्यनगर येथे मोबाईल चार्जिंगवरून साहिल आणि अभिषेक यांच्यात आपापसात वाद झाला होता. हा वाद नेमका काय हे जाणून घ्यायला सुमित गेला असता, साहिल आणि अभिषेक यांना सुमितचा राग आला. याच रागातून त्यांनी अन्य मित्रांच्या सहाय्याने धारदार शास्त्राने वार करत सुमित राऊत याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुमितचा जागीच मृत्यू झाला. वर्तकनगर पोलिस ठाण्यात अजून एका हत्येचा गुन्हा दाखल झाला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 5 आरोपींपैकी 1 आरोपी अल्पवयीन असल्याचं समोर आलंय. सदर आरोपींची पार्श्वभूमी पाहता ते अट्टल गुन्हेगार असल्याचं निदर्शनात आले. पुढील तपास वर्तकनगर पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

मयत तरुणाचे नातेवाईक आक्रमक

या सर्व प्रकरणामध्ये सुमित राऊत याचे नातेवाईक आक्रमक झाले असून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. नाहीतर आरोपींना आमच्या ताब्यात द्या, आमच्या मुलाच्या खुनाचा बदला आम्ही घेऊ अशी देखील आक्रमक प्रतिक्रिया सुमितच्या पालकांची आहे. तरुणांमधील वाढते गुन्हेगारी प्रमाण लक्षात घेता आपला पाल्य गुन्हेगारी क्षेत्रात तर पाऊल टाकत नाही ना याची खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे. (Murder of a young man in a brawl over mobile charging, Three accused arrested while two absconding)

इतर बातम्या

Parbhani Murder : परभणीत अज्ञात कारणावरुन वृद्ध दाम्पत्याची हत्या, एक महिला गंभीर जखमी

Buldhana Murder : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या, आरोपी पत्नीसह प्रियकर अटकेत