‘तेरे घर के सामने’, जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यासाठी अजित पवार गटाची ठाण्यात अनोखी खेळी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या टोकाचा संघर्ष बघायला मिळतोय. दोन्ही गटांनी आपापली बाजू निवडणूक आयोगात मांडली आहे. निवडणूक आयोगात याबाबत लवकरच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. असं असताना आता ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यासाठी अजित पवार गटाने अनोखी खेळी खेळल्याची ठाण्यात चर्चा आहे.

'तेरे घर के सामने', जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यासाठी अजित पवार गटाची ठाण्यात अनोखी खेळी?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 4:01 PM

ठाणे | 10 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सध्या ठाण्यात काय सुरुय? ते समजायला मार्ग मिळताना दिसत नाहीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विचारांच्या विरोधात जावून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला शरद पवार यांच्यासह ठाण्यातील मुंब्रा-कळवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील विरोध केला होता. जितेंद्र आव्हाड सातत्याने अजित पवार यांच्या गटावर टीका करताना दिसले. पण आता जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांच्यात मनोमिलन झाल्याची चर्चा आहे. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे.

अजित पवार गटाचा ठाण्यात काल (9 ऑगस्ट) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांना जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नावर त्यांनी बोलणं टाळलं. विशेष म्हणजे त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करणं टाळलं. अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली नाही म्हणून आव्हाड यांनी देखील ट्विटरवर दोन शब्दांचं विशेष ट्विट केलं.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘आभार दादा’ असं म्हटलं. अजित पवार यांनी आपल्यावर ठाण्यात येवून टीका केली नाही म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे ट्विटरवर जाहीरपणे आभार मानले. त्यामुळे जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार यांचं मनोमिलन झालं की काय, अशी चर्चा आता ठाण्यात रंगली आहे. याबाबतच्या चर्चा ठाण्यात जोरदार रंगलेल्या असताना आता ‘तेरे घर के सामने’ अशी चर्चा देखील आता रंगली आहे.

‘तेरे घर के सामने’ अशी चर्चा का?

अजित पवार यांच्या गटाने जितेंद्र आव्हाड यांना डिवचण्यासाठी त्यांच्या घराच्या समोरच कार्यालय सुरु केल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयाचं बुधवारी संध्याकाळी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. हे नवीन कार्यालय ठाण्यातील विविआना मॉलच्या समोरील सर्व्हिस रोडवर आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचं घरही याच विविआना मॉलच्या मागे आहे. आव्हाड यांच्या घरासमोरून जो रस्ता महामार्गावर येतो अगदी त्याच्या समोरील बाजूलाच हे नवीन कार्यलाय असून ठाण्यात आता एकच चर्चा रंगलीय.

सोशल मीडियावर सध्या ‘एक ऑफिस बनादिया तेरे घरके सामने’ अशा प्रकारचे मेसेजेस आता व्हायरल होत आहेत. याबाबत ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांना विचारलं असता तेरे घर के सामने वगैरे असं काही नसून आम्हाला ही जागा आवडली, ऐसपैस आहे. मुख्य शहराच्या थोडी बाहेर असली तरी आता ठाणे शहर म्हणजे फक्त नौपाडा, पाचपाखडी वगैरे भाग राहिलं नाहीय. सर्वच दृष्टीने केंद्रस्थानी असलेली अशी जागा आम्हाला मिळाल्याने या ठिकाणी हे कार्यालय स्थापन केल्याचं परांजपे यांनी स्पष्ट केलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.