अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजायचे; जितेंद्र आव्हाडांचं ओबीसी मेळाव्यात विधान

राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे वडील आणि आजोबांच्या संघर्षाची कहाणी ऐकवली. धारावीत माझ्या वडिलांनी काही काळ हमाली केली. त्यांनी कधी लाज बाळगली नाही. पण माझा बाप गावी गेला नाही.

अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजायचे; जितेंद्र आव्हाडांचं ओबीसी मेळाव्यात विधान
अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजायचे; जितेंद्र आव्हाडांचं ओबीसी मेळाव्यात विधान
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 3:38 PM

ठाणे: राष्ट्रवादीच्या  (ncp) ओबीसी मेळाव्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी त्यांचे वडील आणि आजोबांच्या संघर्षाची कहाणी ऐकवली. धारावीत माझ्या वडिलांनी काही काळ हमाली केली. त्यांनी कधी लाज बाळगली नाही. पण माझा बाप गावी गेला नाही. शेती नव्हती म्हणून माझे वडील मुंबईत आले. 22 वर्ष व्हिटी स्टेशनला झोपले. माझी आई लॅमिंग्टन रोडला भाजी विकायची. त्यांनी खूप कष्ट केलं. अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील पैसे मोजण्याचे काम करत होते, असं सांगत होय, हाय मी वंजारी, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. मी ज्ञानात कमी नाही. भाषेत कमी नाही अन् कशातच कमी नाही. मी जसा आहे तशीच धमक तुमच्यातही असली पाहिजे. तुमची सर्वांना धडकी भरली पाहिजे, असं सांगतानाच शरद पवार (sharad pawar) यांच्यामुलेच माझं नशिब फळफळलं. मी इथवर येऊ शकलो, असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

आमच्या सरकारने गरीबांच्यासाठी कामे हाती घेतली आहेत. जेव्हा कुणाच्या शिक्षणात अडचणी येतात तेव्हा आमचा जीव तुटतो. आम्हाला खरे आरक्षण हवे आहे. मेरीटमधून आमचे आरक्षण कोणीच काढू शकत नाही. शिक्षकांच्या 55 टक्के आरक्षणातील जागा भरायच्या आहेत. आरक्षण ही नव्या पिढीचा लढाई आहे, ती आपण लढलीच पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

येत्या महिन्यात कामाठीपुऱ्याचा विकास करणार

यावेळी त्यांनी कामाठीपुऱ्याचा विकास करणार असल्याचं जाहीर केलं. येत्या महिन्यात कामाठीपुऱ्याचा विकास करणार आहोत. कामाठीपुरा हा ऐतिहासिक आहे. कामाठी लोक मुंबईत आले आणि ते या परिसरात कष्ट करण्यासाठी थांबले. त्यामुळे या परिसराला कामाठीपुरा म्हणतात. आजही हे लोक दहा बाय दहाच्या घरात राहतात. मी तिथे गेलो होतो. तिथे एकाकडे जेवलो. जेवण अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे होते. गरीबी काय असते हे मी पाहिले आहे. त्यामुळेच मी गरीबांसाठी काम करणार आहे. देवानेही माझ्या हातून हे सत्कार्य घडवून येऊ द्यावे, असं ते म्हणाले.

जाणीव कधी होईल?

आपल्याकडे 354 जाती आहेत. अनेक जातीचे लोक आले आहेत. मी स्वतःच ओबीसी आहे. मी राजकारण केले नाही. पण आपल्या बांधवांसाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज हा आदिवासी आणि भटका आहे. पण आपण मागासवर्गीय आहे हे सांगायची लाज वाटते काहींना, असं सांगतानाच मोदींना कुणी काय दिले यावर मी बोलणार नाही. पण मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचं काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले

तुम्ही पाटील आहात जोशी बुवाचं काम कधीपासून करायला लागलात?; भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल

मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार…!

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.