Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vidoe: मोदी भाषणात चांगलं बोलतात, पण त्यावर कृती होत नाही! सुप्रिया सुळे यांची शेतकरी आंदोलनावरून टीका

मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. (Supriya Sule Narendra Modi)

Vidoe: मोदी भाषणात चांगलं बोलतात, पण त्यावर कृती होत नाही! सुप्रिया सुळे यांची शेतकरी आंदोलनावरून टीका
सुप्रिया सुळे,खासदार
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 6:43 PM

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narnedra Modi) हे मन की बात आणि त्यांच्या भाषणात जे काही बोलतात, ते त्यांच्या कृतीतून उतरत नसल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीय. अंबरनाथमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या. मोदी संसदेत बोलताना फोन करा, म्हणाले. मात्र, आम्ही फोन लावून थकलो. पीएमओमध्ये आमचा फोन कोणीही उचलत नाही, असा टोला सुप्रिया सुळेंनी मोदींना लगावला. (NCP MP Supriya Sule slams PM Narendra Modi over Farmer Protest)

मोदी कुटुंब प्रमुख समजूत काढण्याची जबाबदारी त्यांची

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून एक कुटुंबप्रमुख आहेत. आपल्या घरातलं एखादं मूल जर नाराज असेल, तर त्याची समजूत काढण्याची जबाबदारी ही कुटुंबप्रमुखाची असते. मोदी संसदेत म्हणाले की मला एक फोन करा, मी शेतकऱ्यांशी बोलायला तयार आहे. पण, आम्ही फोन लावून लावून थकलो, तरी आमचा फोन पंतप्रधान कार्यालयात कुणी घेत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना फोन केला तर काय होईल?

नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या फोनची वाट पाहण्यापेक्षा एक फोन शेतकरी नेत्यांना केलात, तर ते तुमच्याशी बोलायला येणार नाहीत का? असा सवालही त्यांनी विचारला. मोदीजी भाषणात आणि मन की बात मध्ये खूप चांगलं आणि पटेल असं बोलतात, पण त्याची कृती होत नाही, याचं दुःख होतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

नरेंद्र मोदींची अश्रू नेमके कुणासाठी?

सुप्रिया सुळे यांनी राज्यसभेत नरेंद्र मोदी भावूक झाल्याचा दाखला यावेळी दिला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद रिटायर झाल्यावर त्यांना अश्रू आवरले नाहीत, पण, आमच्या शेतकऱ्यांवर पाणी मारताना त्यांचे अश्रू दिसले नाहीत, त्यामुळे त्यांचे अश्रू नेमके कुणासाठी आहेत? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

लॉकडाऊनबाबत प्रशासनाचा निर्णय अंतिम

सध्या पुणे मुंबईसह संपूर्ण राज्यात कोरोना पुन्हा वाढत असून या परिस्थितीत लॉकडाऊन करायचं की नाही. अधिवेशन किती दिवसांचं असेल, हे प्रशासन ठरवेल आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य असेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर संजय राठोड प्रकरणाबाबत विचारलं असता, राज्याचे मुख्यमंत्री, महाविकास आघाडी, आणि राज्याचे पोलीस यांच्यावर आपला विश्वास असून खऱ्याला न्याय नक्की मिळेल, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

संबंधित बातम्या:

रावसाहेब दानवेंचं वक्तव्य तथ्यहीन, केंद्रानं हटवादी भूमिका सोडावी- अजित पवार

… आणि पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर का?

राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची जहरी टीका; ठाकरे सरकारला घायाळ करणारे १० मोठे मुद्दे

(NCP MP Supriya Sule slams PM Narendra Modi over Farmer Protest)

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.