Thane Masunda Lake : ठाण्यातील मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मूर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणार

| Updated on: May 31, 2022 | 10:26 PM

सदर घाटावर ठाणेकर नागरिकांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य विसर्जित करण्यात येत असते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव कालावधीत देखील या विसर्जन घाटावर लहान मूर्तीचे विसर्जनकरीता ठाणे महानगरपालिकेद्वारे विशेष विसर्जन व्यवस्था करण्यात येत असते. दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरीता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.

Thane Masunda Lake : ठाण्यातील मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मूर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणार
ठाण्यातील मासुंदा विसर्जन घाटावर निर्माल्य अथवा मूर्ती विर्सजन काही दिवस बंद राहणार
Image Credit source: hindustantimes.com
Follow us on

ठाणे : मासुंदा तलाव (Masunda Lake) येथील दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरीता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले असल्याने विसर्जन घाट (Immersion Ghat) काही दिवस बंद (Closed) राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आगामी गणेशोत्सव व नवरात्रौत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर तलावाची ही सफाई हाती घेण्यात आली आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत निर्माल्य अथवा इतर धार्मिक साहित्य, मुर्तीचे विसर्जन करु नये असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. मासुंदा तलावाच्या ठिकाणी निर्माल्य विसर्जनाकरीता विसर्जन घाटाची (दत्त घाट) निर्मिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे.

पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम पूर्ण करण्यात येणार

मूळ तलावातील पाण्याचे प्रदूषण रोखण्याकरीता व नागरिकांच्या धार्मिक भावना राखून पाण्यामध्ये निर्माल्य विसर्जनाकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता या घाटाची निर्मिती करण्यात आली आहे. सदर घाटावर ठाणेकर नागरिकांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात निर्माल्य विसर्जित करण्यात येत असते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सव कालावधीत देखील या विसर्जन घाटावर लहान मूर्तीचे विसर्जनकरीता ठाणे महानगरपालिकेद्वारे विशेष विसर्जन व्यवस्था करण्यात येत असते. दत्त घाटामधील पाण्याची गुणवत्ता सुधारण्याकरीता पाण्याचा पूर्णपणे उपसा करून गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात पावसाच्या पाण्यामुळे तलावातील पाण्याची पातळी राखता येणार आहे. तरी नागरिकांनी या कालावधीत निर्माल्य अथवा इतर धार्मिक साहित्य, मुर्तीचे विसर्जन करु नये असे आवाहन महापालिकेच् यावतीने करण्यात आले आहे.

ठाणे शहरातील काही भागांत उद्या पाणीपुरवठा बंद

ठाणे महानगरपालिकेच्या रॉ वॉटर पाईपलाईनची कल्याण फाटा भिवंडी येथे NH -4 च्या कामातंर्गत गळती काढणे, पावसाळ्यापूर्वी टेमघर येथे 22 केव्ही सबस्टेशनमध्ये अत्यावश्यक कामे करावयाची आहेत. तसेच टेमघर जलशुध्दीकरण केंद्रामध्ये रॉ वॉटर (PAC) पाईपलाईनला जलमापक लावणे, टेमघर जलशुध्दीकरण केंद्रामधील सॅन्ड फिल्टरची दुरूस्ती करणे, बापगावजवळ रॉ वॉटर पाईपलाईनची जोडणी करण्यात येणार आहे. तसेच स्टेम प्राधिकरणाच्या वतीने पावसाळ्याअगोदर दैनंदिन देखभाल दुरूस्तीची कामे करण्याकरीता बुधवार 1 जून 2022 रोजी सकाळी 9.00 ते गुरूवार सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. (Nirmalya and idol immersion at Masunda Immersion Ghat in Thane will be closed for a few days)

हे सुद्धा वाचा