Thane Police : ठाण्यातील पोलीस लाईनमध्ये 700 कुटुंबाना घर खाली करण्याची नोटीस, पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंता

एकीकडे आमदारांना घरे देण्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. ठाण्यातील (Thane) 700 पोलिसांचे कुटुंबीय (police Family) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) एका पत्रामुळे हवालदिल झाले आहे.

Thane Police : ठाण्यातील पोलीस लाईनमध्ये 700 कुटुंबाना घर खाली करण्याची नोटीस, पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंता
ठाण्यातील पोलीस लाईनमध्ये 700 कुटुंबाना घर खाली करण्याची नोटीसImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:56 AM

ठाणे – एकीकडे आमदारांना घरे देण्यावरून राज्यात वातावरण तापले आहे. ठाण्यातील (Thane) 700 पोलिसांचे कुटुंबीय (police Family) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (Department of Public Works) एका पत्रामुळे हवालदिल झाले आहे. ठाणे शहरातल्या पोलिस वसाहतीमधील पंधरा इमारती धोकादायक स्थितील असल्याने त्या तात्काळ खाली कराव्यात अशा आशयाचं पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस आयुक्तांना दिले आहे. या पत्रानंतर आता या सर्व पोलिस कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. घर खाली करून जायचं कुठं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. अचानक आलेल्या नोटीशीमुळे पोलिस लाईनला ठाण्यातील कोणता नेता मदत करेल अशी देखील चर्चा आहे. पावसाळ्यापुर्वी धोकादायक स्थितीत असलेल्या इमारती खाली कराव्या लागणार आहेत.

thane police line

पोलिस कुटुंबियांना मिळालेले पत्र

मग आमच्या घरासाठी का विचार केला जात नाही

देशात आणि राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावा. आपण सर्व सुरक्षित राहावे, यासाठी ऑन ड्युटी 24 तास काम करणाऱ्या पोलिसांचे कुटुंबीय आपला जीव मुठीत धरून राहत असल्याची बाब आता समोर आली आहे. ठाणे शहरातील पोलिस आयुक्त कार्यालयाजवळ 1980 साली इमारती बांधण्यात आल्या. बांधण्यात आलेल्या इमारतींना अनेक वर्ष झाल्याने त्या धोकादायक स्थितीत आहेत. धोकादायक पंधरा इमारती तात्काळ तात्काळ रिकाम्या कराव्यात, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलीस आयुक्तांना दिले आहे. तसेच पोलिस लाईनमध्ये राहणाऱ्या प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याच्या घरी दिले आहे. त्यामुळे आता या 15 इमारतीमध्ये राहणाऱ्या 700 पोलीस कुटुंबियांसमोर नवीन घर भाड्याने घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आता तात्काळ मुलांच्या शाळा, नोकरीचे ठिकाण आणि सर्व काही लगेच कसे बदलता येईल यामुळे पोलिस कुटुंबियांची चिंता वाढली आहे. आमदारांना न मागता घर देता मग आम्ही एवढे वर्ष भाडे भरूनही आम्हाला का घर देत नाही. आमचे कुटुंबीय नागरिकांच्या सेवेसाठी जीव धोक्यात घालून काम करतात. मग आमच्या घरासाठी का विचार केला जात नाही, असा सवाल आता पोलीस कुटुंबीय विचारत आहे.

एकतर छोटीशी घरे त्यात सुविधांचा अभाव आहे

एकतर छोटीशी घरे त्यात सुविधांचा अभाव आहे. मात्र या घरांसाठी ही महिन्याला पोलिसांच्या पगारातून 12 हजार ते 15 हजार घर भाडे कापले जाते. घर घेण्याची पात्रता नसल्यामुळे स्वतःचे घर घेता येत नाही. म्हणून नाईलाजाने या धोकादायक इमारतींमध्ये आपला जीव मुठीत धरून पोलीस कुटुंबियांना राहावं लागत आहे. आधीच भाडे कपात त्यात मुलांचे शिक्षण, रुग्णालय खर्च, घर खर्च करून मेटाकुटीला आलेल्या या कुटुंबियांना आता अचानक आलेले हे पत्र हवालदिल करणारे आहे अशी प्रतिक्रिया एका कुटुंबियाने दिली.

पोलिस कुटुंबीयांचे डोळे मदतीसाठी नेत्यांकडे

ठाण्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस, आता त्यांच्या या सातशे कुटुंबीयांचा प्रश्न कोणी सोडवेल. अशी आशा ठाण्यातील पोलिस लाईनमध्ये राहणाऱ्या कुटुंबिय नेत्यांकडून करत आहेत. कोणत्याही पक्षाने नेत्याने यामध्ये तातडीने लक्ष घालून लागलीच पर्यायी व्यवस्था निर्माण करावी असे आवाहन एका कुटुंबीयाने केले आहे.

Suicide | रानडुक्कर शिकार प्रकरणात रंगेहाथ अटक, आरोपीची शेतात आत्महत्या

IPL 2022, Orange Cap : फॅफ डू प्लेसिसकडे ऑरेंज कॅपचा ताबा कायम, चेन्नईचे स्टार्स देखील ऑरेंज कॅपच्या शर्यतीत

April Fool’s Day | एप्रिल Fool’s Day 1 एप्रिललाच का साजरा केला जातो, जाणून घ्या काय आहे या दिवसाचा इतिहास

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.