अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा; मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची मागितली होती परवानगी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत भोंगे उतरले, तर आमच्याकडून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, असे सांगत त्यांनी 3 मे नंतर आक्रमक भूमिका घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराच सरकारला दिला आहे.

अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा; मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची मागितली होती परवानगी
अंबरनाथमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा; मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची मागितली होती परवानगीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 4:23 PM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये मनसेच्या (Ambarnath MNS) पदाधिकाऱ्यांकडून मशिदींसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावण्याची परवानगी मागितल्यानंतर पोलिसांकडून प्रमुख पदाधिकाऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला. अंबरनाथमधील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी 4 मे रोजी अंबरनाथमधील मशिदींसमोर हनुमान चालीसा लावायला परवानगी देण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना (MNS Leaders) सीआरपीसी 149 अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. शहरात कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत भोंगे उतरले, तर आमच्याकडून तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, असे सांगत त्यांनी 3 मे नंतर आक्रमक भूमिका घेण्याचा अप्रत्यक्ष इशाराच सरकारला दिला आहे.

न्यायालयाच्या आदेशाचं पालन

त्या अनुषंगाने अंबरनाथमध्ये शांतता कमिटी आणि सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये मुस्लिम समाजाने आम्ही भोंगे अजिबात काढणार नाही, मात्र सरकार आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करू, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसेनंही आक्रमक पवित्रा घेत अंबरनाथ शहरात 6 ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याची परवानगी पोलिसांकडे मागितली आहे. या मागणीसाठी मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के, शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर उपाध्यक्ष प्रशांत नलावडे, प्रफुल सूर्यराव यांच्यासह मनसे शिष्टमंडळाने आज अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची भेट घेतली.

हनुमान चालीसा लावायची नाही

यावेळी कोते यांनी हनुमान चालीसा लावण्यास परवानगी द्यायला स्पष्ट शब्दात नकार दिला. सोबतच शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सीआरपीसी 149 अन्वये नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. नोटीसा मिळाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या 3 मेच्या अल्टिमेटमची आठवण करून दिली आहे. कायद्याचं आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करणे गरजेचं असून 3 मेनंतर भोंगे सुरूच राहिले, तर राज साहेबांच्या आदेशांचं पालन करू, अशी भूमिका मनसे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के आणि मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी घेतली आहे.

या सगळ्या प्रकारानंतर आता 3 मेपर्यंत सरकार नेमकी काय नियमावली जाहीर करते? आणि त्याचं पालन होतं का? की मनसेला आंदोलन करण्याची वेळ येते? हे आता पाहावं लागणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.