कोरोनाचे नियम मोडले तर ऑफिस, दुकाने सील करा; महापालिका आयुक्तांचा आदेश

गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज करावीत असे सांगून मंगल कार्यालये, क्लब या ठिकाणी रोजच्या रोज भेटी देवून तेथील कार्यक्रमांचा आढावा घ्यावा व त्यांच्याकडून आगाऊ माहिती घेण्यात यावी, अशा सूचना विपीन शर्मा यांनी दिल्या. | Thane commissioner

कोरोनाचे नियम मोडले तर ऑफिस, दुकाने सील करा; महापालिका आयुक्तांचा आदेश
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:39 PM

ठाणे: कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी प्रभाग समिती स्तरावरील कामाची पाहणी करण्यास सुरूवात केली आहे. शर्मा यांनी सोमवारी कळवा प्रभाग समितीतंर्गत विविध ठिकाणांची पाहणी करून स्थानिक नगरसेवक आणि नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान ज्या आस्थापना, दुकाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापराच्या नियमांचा भंग करतील त्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश त्यांनी परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. (seal Offices and shops who not following corona rules)

प्रभाग समितीतंर्गत येणारी सर्व सार्वजनिक शौचालयांची रोज पाच ते सहावेळा नियमितपणे साफसफाई करावी, समितीतंर्गत येणारी सार्वजनिक ठिकाणे, गर्दीची ठिकाणे सॅनिटाईज करावीत असे सांगून मंगल कार्यालये, क्लब या ठिकाणी रोजच्या रोज भेटी देवून तेथील कार्यक्रमांचा आढावा घ्यावा व त्यांच्याकडून आगाऊ माहिती घेण्यात यावी, अशा सूचना विपीन शर्मा यांनी दिल्या.

औषधं आणि आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर

प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांसाठी औषधांचा आवश्यक तो साठा करणे, कोविड १९ चाचणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा गतिमान करणे, टीएमटीच्या बसेसचा फिरते ॲंटीजन चाचणी केंद्र म्हणून वापर करणे, ज्या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे, तेथील सर्वेक्षण करणे, तापाची तपासणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीनंतर महापालिका आयुक्तांनी खारेगाव नाका, खारीगाव नाका शौचालय, वास्तु आनंद गृह संकुल, ओझोन व्हॅली गृह संकुल आदी ठिकाणी भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.

संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारमधील अर्ध्या मंत्रिमंडळाला कोरोना, कुणाची कोरोनावर मात, तर कोण अजूनही पॉझिटिव्ह

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

(seal Offices and shops who not following corona rules)

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...