22.02.2022 युनिक तारखेला 65 जणांचं लग्न! आता तरी लग्नाचा वाढदिवस लक्षात राहील ना?

Unique Date 22 February 2022 : लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही, म्हणून कडाक्याची भांडणं झाल्याचं तुम्ही ऐकलं असलेच. तर दुसरीकडे नवऱ्यांना लग्नाचा वाढदिवस लक्षात राहतच नाही, अशा तक्रारी करणाऱ्या बायका दर चार पावलांवर बघायला मिळतील, अशीही चर्चा रंगते.

22.02.2022 युनिक तारखेला 65 जणांचं लग्न! आता तरी लग्नाचा वाढदिवस लक्षात राहील ना?
युनिक दिवशी तब्बल 65 जोडप्यांची ठाण्यात लग्न
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 8:35 PM

ठाणे : लग्न आणि लग्नाचा वाढदिवस (Wedding & Wedding anniversary) या तसं बघायला गेलं तर फार मामुली गोष्ट आहे. पण ही मामुली गोष्ट अनेकदा नवरोबांना महागात पडते. अनेकांना लग्नाचा वाढदिवस लक्षातच राहत नाही. आता लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवायचा की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कोणत्याही नवरीसाठी तिचं लग्न म्हणजे लक्षात ठेवण्यासारखीच गोष्ट असते. त्यामुळे नवरे काही लग्नाचा वाढदिवस वगैरे लक्षात ठेवत नाहीत, त्यांना सारखी आठवण करुन देत राहावी लागले, असा एक स्टिरीओटाईम पूर्वापार चालत आलेला आहे. म्हणून मग पुढे जाऊन लक्षात राहितील अशातच तारखांना (Unique Date) लग्न करण्याचाही एक ट्रेन सेट झाला होता. तो ट्रेन्ड अजूनही सुरु आहेत. 2022 या वर्षातल्या दुसऱ्या महिन्यातली 22 तारीख ही लक्षात ठेवण्यासारखीच आहे. अशा तारखा दरवर्षी थोडीच येत असतात. आल्या तरी त्या तारखांना लग्नाचा मुहूर्त असेलच असंही नाही. म्हणूनच 22.02.2022 (22nd February, 2022) या तारखेला लग्न करण्यांची गोष्ट खास असणार आहे. एकतर ही तारीख आणि आता आयुष्यभर लक्षात राहील असा हा दोनाचे चार हात झालेल्याचा क्षण!

130 जणांचे दोनाचे 4 हात झाले…

आपल्याला हव्या असणाऱ्या लकी आणि आवडत्यानंबर साठी अनेकजण खटापटी करत असतात. यात गाडीचा नंबर असो, मोबाईलचा नंबर असो वा घराचा नंबर. तो नंबर मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करतो. अशाच युनिक आकड्याचं औचित्य साधून ठाण्यातील 65 जोडपी विवाहबंधात अडकली आहेत. 22-2-2022 या तारखेमध्ये 2 हा आकडा सहा वेळा आलाय. याच अनोख्या या दिवसाचे औचित्य साधून ठाण्यातील जवळपास 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत.

नव दाम्पत्य काय म्हणालं?

आमच्यासाठी हा लकी दिवस असून या अनोख्या दिवशी आम्ही विवाह बंधनात अडकायचे ठरवले होते तसेच अनोखी तारीख पुन्हा कधी येणार नाही यासाठी पंचेचाळीस दिवस अगोदरच नोंदणी करून ठेवल्याच काही जोडप्यांची सांगितलं. पुढे या तारखेचा दिवस पुन्हा कधीच येणार नाही आणि ही तारीख आयुष्यभर लक्षात राहणार आहे, असंही काहींनी म्हटलंय. आजच्या तारखेत 2 आकडा 6 वेळा आल्याने हा शुभ दिवस असल्याचे नवविवाहित जोडप्यांनी सांगितले.

लग्नाचा वाढदिवस नवरोबांना राहील ना लक्षात?

तारीख युनिक असली तरिही या तारखेला लक्षात ठेवण्याचं आव्हान असणारच नाही, असं होणार नाही. लग्नाचा वाढदिवस लक्षात राहिला नाही, म्हणून कडाक्याची भांडणं झाल्याचं तुम्ही ऐकलं असलेच. तर दुसरीकडे नवऱ्यांना लग्नाचा वाढदिवस लक्षात राहतच नाही, अशा तक्रारी करणाऱ्या बायका दर चार पावलांवर बघायला मिळतील, अशीही चर्चा रंगते.

आता युनिक तारखेला लग्नाच्या बंधनात अडकलेल्या या नवरदेवांना नव्या आयुष्यासाठी, संसारासाठी शुभेच्छा तर देऊयाच. शिवाय हा युनिक दिवस कायम स्वरुपी त्यांच्या लक्षातही राहावा, अशी देवाचरणी प्रार्थनाही करुयात.

संबंधित बातम्या :

Palmistry | तळहाताच्या रेषांमध्ये दडलंय तुमच्या लग्नाच रहस्य, लव्ह मॅरेज होणार की अरेंज , जाणून घ्या तुमच्या रेषा काय सांगतात

कोल्हापुरात मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलाच्या कुटुंबियांवर हल्ला

प्रेमविवाह केला म्हणून…! सांगलीत सैराटची पुनरावृत्ती, आधी मुलीच्या वडिलांनी धमकावलं, योगेशला अज्ञातांनी भोसकलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.