उल्हासनगर : देवदर्शनाच्या बहाण्याने मंदिरात येऊन एका चोरट्याने देवाच्या चांदीच्या पादुका (Paduka) चोरून नेल्याची घटना शनिवारी रात्री उल्हासनगरात घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही (CCTV)त कैद झाली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही तासातच या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. चोरट्याकडून चोरी गेलेल्या पादुका ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नितीन पाईकराव (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Padukas stolen from Gurunanak Darbar in Ulhasnagar, incident captured on CCTV)
उल्हासनगरच्या कॅम्प 4 मधील सेक्शन 30 मध्ये गुरुनानक दरबार आहे. या दरबारात शनिवारी 19 मार्च रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास एक चोरटा घुसला. या चोरट्याने आधी मंदिरात देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर देवाच्या चांदीच्या पादुका उचलून रुमालात गुंडाळल्या. त्यानंतर पुन्हा देवाचे दर्शन घेत नमस्कार केला आणि पोबारा केला. काही वेळाने पादुका जागेवर नसल्याची बाब मंदिराच्या सेवेकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही तपासले असता, त्यामध्ये लाल रंगाचा शर्ट घातलेला एक इसम दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात आला आणि त्याने पादुका चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही तासातच या चोरट्याचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. चोरट्याडून चोरलेल्या पादुकाही हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वसई, विरार, नालासोपाऱ्यात चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. वसईच्या कामन गावातील एका घरासमोर पार्क केलेली अॅक्टिव्हा गाडी चोरुन नेल्याची घटना 20 मार्च रोजी घडली आहे. ही चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झली आहे. निलेश गुप्ता असे चोरी गेलेल्या गाडी मालकाचे नाव आहे. 20 मार्च रोजी साडे तीन च्या सुमारास चोरट्यानी पहाटेच्या ही गाडी चोरून नेली आहे.. ही घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही आधारे पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. (Padukas stolen from Gurunanak Darbar in Ulhasnagar, incident captured on CCTV)
इतर बातम्या
CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद