Big News : संसदेतील घुसखोरीचं कनेक्शन कल्याणमध्ये?; पोलिसांकडून कुणाची होतेय कसून चौकशी?

संसदेतील घुसखोरीचे पडसाद देशभरात उमटले आहेत. संसदेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे हा लातूरचा रहिवाशी असल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या गावात जावून पोलिसांनी कसून चौकशी केली. तसेच या घुसखोऱांनी कल्याणमधून स्मोक कँडल खरेदी केल्याचं वृत्त धडकल्याने पोलीसही ॲक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी कल्याणमधील व्यापाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. तसेच फटाक्यांची तपासणी सुरू केली आहे.

Big News : संसदेतील घुसखोरीचं कनेक्शन कल्याणमध्ये?; पोलिसांकडून कुणाची होतेय कसून चौकशी?
parliament security breach case
Follow us
| Updated on: Dec 16, 2023 | 3:13 PM

ठाणे | 16 डिसेंबर 2023 : दोन दिवसांपूर्वी चार जणांनी संसद आणि संसदेच्या बाहेर घुसखोरी करत मोठा राडा केला. दोन जणांनी संसदेत जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच संसद आणि संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडून सरकार विरोधात रोष व्यक्त केला. बेरोजगारीच्या मुद्द्यावर या तरुणांनी संसदेत घुसखोरी करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या चारही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू झाला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कल्याणमध्येही असल्याचं सांगितलं जात असून कल्याणमध्येही झाडाझडती सुरू करण्यात आली आहे.

संसदेत घुसखोरी केलेल्या तरूणांनी धुराच्या नळकांड्या कल्याण शहरातून खरेदी केल्या होत्या, असे वृत्त प्रसारित झाल्यानंतर कल्याणमधील पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच स्थानिक पातळीवर प्रसारित वृत्ताच्या आधारे शहरातील फटाके विक्रेत्यांची चौकशी करण्यास सुरू केली आहे. मात्र तेवढ्या क्षमतेच्या धूर नळकांड्या विकत नसल्याचे दुकानदारांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुकानात असलेल्या फटाक्यांचे आणि नळकांड्यांची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच परिसरातील इतर दुकानांचीही पाहणी केली.

विचारणा होण्यापूर्वीच कारवाई

संसदेत घुसखोरी करणाऱ्या तरुणाकडे सापडलेल्या रंगीत धुराच्या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खरेदी केल्याची बातमी आली होती. या नळकांड्या त्यांनी कल्याणमधून खेरदी केल्याचं वृत्तही आलं होतं. त्यामुळे दिल्लीतील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली होती. दिल्लीतील तपास यंत्रणांनी विचारणा करण्यापूर्वीच कल्याण पोलीस कामाला लागले. कल्याण पोलिसांनी तातडीने स्थानिक फटाके विक्रेत्यांची कसून चौकशी सुरू केली.

व्यापारी घाबरले

काल दुपारी कल्याणच्या अहिल्याबाई चौकातील एका फटाके विक्रेत्याची पोलिसांनी चौकशी केली. यावेळी संसदेत वापरलेले तेवढ्या क्षमतेच्या धूर नळकांड्यांची कल्याणमध्ये विक्री होत नसल्याचे दुकानदारांनी सांगितलं. पण पोलिसांनी फटाके विक्रेत्यावर विश्वास न ठेवता दुकानात असलेल्या फटाक्यांचे आणि नळकांड्याची प्रत्यक्षात पाहणी केली. तसेच या सर्व गोष्टींची नोंदही पोलिसांनी करून घेतली आहे. सध्या अश्याप्रकारे अनेक दुकानदारांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. परिसरातील इतर दुकानातही असाच तपास करण्यात येत आहे. पोलिसांकडून अनेकदा आणि अचानक तपास करण्यात येत असल्याने व्यापारी घाबरून गेले आहेत. आपल्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे असा सवाल हे विक्रेते विचारत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.