Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदेंविरोधात ठाणे न्यायालयात याचिका, मंत्रालयात सत्यनारायण पुजेच्या आरोपावरून वाद पेटला
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा केल्याचा आरोप करत या विरोधात ठाणे कोर्टात धाव घेण्यात आली आहे, त्यामुळे आता हे अनोखं प्रकरण चर्चेत आलंय.
ठाणे : राज्यातलं ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) पाडून शिंदे सरकार (Cm Ekanath Shinde) अस्तित्वात आल्यानंतर राज्यातल्या प्रत्येक माणसाला एक शब्द मात्र पुन्हा ऐकायला मिळतोय. तो म्हणजे याचिका, या कोर्टात याचिका, त्या कोर्टात याचिका, हा याचिका नावाचा शब्द सर्वांना चांगलाच परिचित झाला आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांमध्ये आणखी एका याचिकेची भर पडलेली आहे. ही याचिका शिवसेनेकडून (Shivsena) किंवा ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेली नाहीये. तर ही याचिका एका वेगळ्याच प्रकरणात दाखल केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना मंत्रालयात सत्यनारायणाची पूजा केल्याचा आरोप करत या विरोधात ठाणे कोर्टात धाव घेण्यात आली आहे, त्यामुळे आता हे अनोखं प्रकरण चर्चेत आलंय.
मत्रालयात पूजा केल्याचा आरोप
गेला काही दिवसांपूर्वीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पहिल्यांदा प्रवेश करताना सत्यनारायणाची पूजा केली असा आरोप करत एक निवेदन थेट राज्यपाल महोदयांकडे दाखल झालं होतं. तसेच राज्यपाल महोदयांनी या निवेदनाची दखल घेऊन घटणेच्या मर्यादा राखण्यासाठी तात्काळ पाऊलं उचलावधी अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र आता हेच प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयात प्रवेश करताना सत्यनारायणाची पूजा घातल्या विरोधात ठाण्यातल्या कोर्टात आता नवी याचिका दाखल करण्यात आली.
याकिकाकर्त्यांचा नेमका आक्षेप काय?
महाराष्ट्र राज्य धरण धर्मनिरपेक्ष राज्य असून संविधानिक ठिकाणी अशा प्रकारची वागणूक चुकीची असल्याचे याचिकाकरते धनाजी सुरवसे यांचे म्हणणे आहे. यावरूनच ते आक्रमक झाले आहेत. एकीकडे एक ऑगस्टला एकनाथ शिंदे यांच्या सरकार बाबत आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत दिल्लीतल्या सुप्रीम कोर्टात मोठा फैसला येण्याची शक्यता आहे. तर त्याचवेळी 1 ऑगस्टलाच ठाण्यातल्या कोर्टात ही या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे.
1 ऑगस्ट हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचा
त्यामुळे सहाजिकच एक ऑगस्ट ही तारीख एकनाथ शिंदे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 16 आमदारांच्या पत्र्याचे अपात्रतेसाठी शिवसेनेकडून एकापाठोपाठ एक अशा चार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या. तसेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण हे कुणाचं यावरूनही सध्या चांगलाच वाद पेटला आहे, त्यासाठीही लढाई सुरू असताना त्यात आता सत्यनारायणाच्या पूजेचा वाद निर्माण झाल्याने हे प्रकरण वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे.