Inflation : युवासेनेचं राज्यव्यापी थाळी बजाव आंदोलन, रस्त्यावर भाकरी, पुतळ्याला जोडे, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी
गेल्या अनेक दिवसांपासून महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. तर राज्याने टॅक्स कमी न केल्याने पट्रोलच्या किंमती कमी होत नाही, असा वारंवार आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दोन्ही बााजुने यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
ठाणे : सध्या पट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price Hike) भाव गगनाला भिडले आहेत. गॅसच्या किंमतीही (Cylinder Price) जोरदार वाढल्या आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला जोरदार कात्री लागलेय. अशातच शिवसेना (Shiv Sena) केंद्र सरकारविरोधात चांगलीच आक्रमक झालीय. महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात राज्यभर शिवसेनेतर्फे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेना युवा सेना पदाधिकारी दिपेश म्हात्रे ,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे नेतृत्वात शिवसेना कार्यकर्त्यांनी थाली बजावत भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका होत आहे. तर राज्याने टॅक्स कमी न केल्याने पट्रोलच्या किंमती कमी होत नाही, असा वारंवार आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. दोन्ही बााजुने यावरून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता पुन्हा शिवसेने आंदोलनाचं हत्यार उपसल्याने हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रस्त्यावर भाकरी थापत निषेध नोंदवला
पेट्रोल-डिझेल, सिलेंडरच्यादर दिवस वाढणाऱ्या दरांमुळे, वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडे मोडले आहे. हाच मुद्दा पकडून शिवसेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे .आज टिटवाळा येथे शिवसेना ,काँग्रेस, राष्ट्रवादी तर्फे महागाई विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते . या निषेध मोर्चात हातात निषेधाचे फलक घेत तिन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.या मोर्चात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली .
महागाईविरोधात युवासेना रस्त्यावर
गॅसच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत सांगत, टिटवाळा स्टेशन परिसरात महाविकास आघडीच्या महिला कार्यकर्त्यानी भाकरी थापून तसेच महागाईच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत मोदी सरकारचा निषेध नोंदवला. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जणू सासू-सूनेचं भांडण सुरू आहे. रोज नवीन मुद्यावरून केंद्र आणि राज्य सराकर आमनेसामने येत आहेत. राज्यात करण्यात येणाऱ्या ईडीच्या कारवाईविरोधात महाविकास आघाडी केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहे. आता महागाईच्या मुद्द्यावरुनही केंद्रविरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. फक्त डोंबिवलीतच नाही, राज्यात अनेक ठिकाणी महागाईविरोधात थाळीबजाओ आंदोलन करण्यात आली आहेत.
नाशिक शहरातील स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामांची पालकमंत्री Chhagan Bhujbal यांनी केली पाहणी