Ulhasnagar Crime : इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणं तरुणांना महागात, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून पोलिसांची कारवाई

विठ्ठलवाडी पोलिसांनी या सर्वांचा शोध घेत कृष्णा कुंभार, विशाल कुंभार, अभय गायकवाड, रोशन मलिक आणि एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण पाच जणांना अटक केली. यापैकी चौघांची न्यायालयीन कोठडीत, तर एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

Ulhasnagar Crime : इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणं तरुणांना महागात, सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून पोलिसांची कारवाई
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 10:30 PM

उल्हासनगर : थेरगाव क्वीन प्रकरण ताजं असतानाच आता उल्हासनगरात इंस्टाग्राम (Instagram)वर दादागिरीचे व्हिडीओ बनवून टाकणं काही तरुणांना महागात पडलं आहे. कारण हे व्हिडीओ टाकून समाजात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना थेट जेल (Jail)ची हवा खावी लागली आहे. उल्हासनगरात सोमवारी इंस्टाग्रामवरील काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात काही तरुण दादागिरीची भाषा वापरत शिवीगाळ करत होते. विशेष म्हणजे काही व्हिडिओमध्ये तरुणांच्या हातात बंदुकासुद्धा दिसत होत्या. यामध्ये 307, 302 असेही शब्दप्रयोग वापरण्यात आले होते. (Police arrest five youths in ulhasnagar for making gangster reels on Instagram)

चौघांची न्यायालयीन कोठडीत तर एकाची बालसुधारगृहात रवानगी

हे कलम हत्येचा प्रयत्न आणि हत्या यांचे असल्याने संबंधित तरुण समाजात दहशत माजवून दादागिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं विठ्ठलवाडी पोलिसांनी या सर्वांचा शोध घेत कृष्णा कुंभार, विशाल कुंभार, अभय गायकवाड, रोशन मलिक आणि एक अल्पवयीन मुलगा अशा एकूण पाच जणांना अटक केली. यापैकी चौघांची न्यायालयीन कोठडीत, तर एकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली. या व्हिडिओमध्ये दिसणारे तरुण हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यातील एकावर तडीपारीची कारवाई सुद्धा प्रस्तावित आहे. या सर्वांचा उन्माद पोलीस ठाण्यात येताच कमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलंय. यानंतर आता पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली.

उल्हासनगरात स्मशानाबाहेर दोघांवर जीवघेणा हल्ला

अंत्यसंस्काराला उपस्थित राहून स्मशानातून बाहेर पडताच दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणांच्याच चुलत भावाने हा हल्ला केला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या हल्ल्यातील मुख्य आरोपी विजय पाटील हा नशेच्या आहारी गेला असून त्याचे चुलत भाऊ त्याची पोलिसांकडे तक्रार करतात. या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, आरोपी विजय पाटील याचा मोठा भाऊ मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील याची वर्षभरापूर्वी हत्या झाली होती. त्यामुळे आजच्या प्रकरणाचा जुन्या प्रकरणाशी काही संबंध आहे का? याचीही पडताळणी पोलिसांकडून केली जातेय. मात्र सातत्यानं घडणाऱ्या या घटनांमुळे अंबरनाथ गाव परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Police arrest five youths in ulhasnagar for making gangster reels on Instagram)

इतर बातम्या

मोठ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चुलत भावावर हल्ला? उल्हासनगरच्या स्मशानाबाहेरच जीवघेणा हल्ला

Kalyan Fraud : कल्याणमध्ये गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये घेऊन आणखी एक ज्वेलर्स फरार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.