Virar Crime: लग्नाच्या खरेदीसाठी सोन्याच्या दुकानात आली; पिस्तुकल दाखवून धमकावलही मात्र मालकानं हुशारी दाखवत झडपच घातली

नकली बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या महिलेन दुकानात एकटाच मालक असल्याने आणि बाहेरील परिस्थितीचा हाकहवाला घेऊनच हे धाडस केले आहे मात्र दुकानदाराच्या धाडसामुळे महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Virar Crime: लग्नाच्या खरेदीसाठी सोन्याच्या दुकानात आली; पिस्तुकल दाखवून धमकावलही मात्र मालकानं हुशारी दाखवत झडपच घातली
नकली बंदुकीचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या महिलेला पकडले
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 5:03 PM

विरारः नकली बंदुकीचा (Dup;icate Gun) धाक दाखवून, ज्वेलर्समधील सोने (Gold theft) पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका सराईत चोरट्या महिलेला ज्वेलर्स मालकाने मोठ्या धाडसाने पकडले आहे. चोरटी महिला आणि ज्वेलर्स मालक यांच्या झटापटीचा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकारामुळे दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. सध्या असे प्रकार वाढत असून अशा भूरट्या चोऱ्या करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये होत आहे.

या प्रकरणाबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. नकली बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या महिलेन दुकानात एकटाच मालक असल्याने आणि बाहेरील परिस्थितीचा हाकहवाला घेऊनच हे धाडस केले आहे मात्र दुकानदाराच्या धाडसामुळे महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वेळ साधून महिलेचे धाडस

विरार पश्चिम ग्लोबल सिटी परिसरात देवनारायण ज्वेलर्सच्या दुकानात आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. दुपारची वेळ असल्याने दुकानांंमध्ये आणि रस्त्यावरही वर्दळ कमी होती. त्यामुळेच अशा चोऱ्या करणाऱ्यांची संख्या परिसरात वाढली असल्याचे बोलले जात आहे.

दोन तास दुकानात दागिने पाहत होती

एक महिला काळा बुरखा घालून, दागिने खरेदीसाठी ज्वेलर्समध्ये आत शिरली होती. लग्नासाठी दागिने खरेदी करायचे असे सांगून, जवळपास दोन तास दुकानात दागिने पाहत होती. दुकानात आणि रस्त्यावर कुणी नाही हेरून, तिने स्वतः जवळच्या पिशवीतून एक नकली पिस्तुल काढून, पिस्तुलीच्या धाकावर ज्वेलर्सचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला.

धाडसामुळे प्रयत्न फसला

मात्र दुकानाचे मालक देवीलाल गुर्जर यांच्या धाडसामुळे तिचा हा प्रयत्न फसला. देवीलाल यांनी महिलेच्या हातातून पिस्तुल हिसकावून, तिचे केस पकडून तिला पकडून ठेवून, अर्नाळा पोलिसांच्या हवाली केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.