उल्हासनगर : पहाटे शौचालयात जाणाऱ्या इसमाची मोबाईल चोरीसाठी हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना उल्हासनगरात घडली होती. याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. गौतम राजेश झा आणि अजय संजय शिरसाट अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तांत्रिक तपासाच्या आधारे 48 तासात पोलिसांनी ही कारवाई केली. मुन्नीलाल जयस्वार असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दुचाकीहून आलेल्या दोघांनी जयस्वार यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला होता. याला जयस्वार यांनी प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघा चोरट्यांना बेड्या ठोकल्या. (Police have arrested two thieves for murdering a mobile phone in Ulhasnagar)
उल्हासनगरच्या कॅम्प 3 मध्ये राहणारे मुन्नीलाल जैस्वार हे 9 एप्रिल रोजी पहाटे सार्वजनिक शौचालयात जात होते. यावेळी त्यांच्या मागून दुचाकीहून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांचा मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र मुन्नीलाल यांनी त्याला प्रतिकार केल्याने या चोरट्याने मुन्नीलाल यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केलं आणि त्यांचा मोबाईल हिसकावत पळ काढला. ही सगळी घटना परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. या हल्ल्यानंतर जखमी मुन्नीलाल यांना उपचारासाठी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. यामध्ये गौतम राजेश झा आणि अजय संजय शिरसाट या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
एका ओळखीच्या व्यक्तीची गाडी घेऊन त्यांनी हा गुन्हा केला. केवळ मोबाईल चोरण्याच्या दृष्टीने आपण गेलो होतो. मात्र मुन्नीलाल यांनी प्रतिकार केल्याने आपण त्यांच्यावर वार केले, अशी कबुली या दोघांनी पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पाठरे यांनी दिली. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता त्यांना 18 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वीही पोलिस रेकॉर्डवर नसलेले असे काही गुन्हे केले आहेत का? याची आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. (Police have arrested two thieves for murdering a mobile phone in Ulhasnagar)
मोबाईल चोरीसाठी हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या#Ulhasnagar #MobileSnatching #Arrest pic.twitter.com/AhTEW2kwjo
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022
इतर बातम्या
Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनीत अपघात, प्लान्टमध्ये पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
Kalyan Crime : कल्याणमधील सराईत गुन्हेगार पापा हड्डीच्या बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या मुसक्या