भाजपच्या ‘गाजर दाखवलं’ला शिवसेनेचं ‘करून दाखवलं’ने प्रत्युत्तर; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीपूर्वीच ‘बॅनर युद्ध’

कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण पालिकेची निवडणूक कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (bjp) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

भाजपच्या 'गाजर दाखवलं'ला शिवसेनेचं 'करून दाखवलं'ने प्रत्युत्तर; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीपूर्वीच 'बॅनर युद्ध'
शिवसेनेचा दावा, 'करून दाखवलं', भाजप म्हणते, 'गाजर दाखवलं'; कल्याण-डोंबिवलीत निवडणुकीपूर्वीच 'बॅनर युद्ध'
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 1:05 PM

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका (kdmc) निवडणुकीची तारीख अजून जाहीर झालेली नाही. पण पालिकेची निवडणूक कधीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (shivsena) आणि भाजपमध्ये (bjp) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मीडियासमोर येऊन दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करत असतानाच आता शहरात दोन्ही पक्षात बॅनर युद्ध सुरू झाले आहे. भाजपने बॅनर लावून एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलेलं असतानाच आता शिवसेनेने बॅनर लावूनच भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदेच डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी आहेत, असा बॅनर भाजप आमदारांनी लावला होता. तर गेली 13 वर्ष आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेले लोकप्रतिनिधीच डोंबिवलीतील विकासाच्या खरे मारेकरी आहेत. डोंबिवलीसाठी काय केलं सांगा? असा बॅनर लावून शिवसेनेने भाजपला चोख उत्तर दिलं आहे. डोंबिवली स्टेशनबाहेरच दोन्ही पक्षात हे बॅनर युद्ध रंगलं आहे. मात्र, पोलिसांच्या मदतीने केडीएमसीने हे बॅनर काढले आहेत. मात्र, शहरात बॅनर युद्ध सुरूच राहणार असल्याचे यातून संकेत मिळताना दिसत आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष शिगेला पोहोचलाय. शिवसेना-भाजप नेते आरोप-प्रत्यारोपांची एकही संधी सुटत नसल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांना लक्ष केलं होतं. पालक मंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीच्या विकासाचे मारेकरी असल्याचा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला होता यानंतर डोंबिवलीत या आशयाचे बॅनर देखील चव्हाण यांनी लावले होते. त्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने हे बॅनर काढला होते. त्यापाठोपाठ आज शिवसेनेने बॅनरबाजी करत भाजप आमदारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

डोंबिवली स्टेशनबाहेरच बॅनरबाजी

शिवसेनेने आज डोंबिवली स्टेशन आणि इतर ठिकाणी बॅनर लावले होते. या बॅनरवर एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. त्यावर फक्त 2 वर्षाच्या काळात 1690 कोटींचे प्रकल्प मार्गी लावले असं लिहत कामांची यादी टाकण्यात आली आहे. तसेच करून दाखवलं असंही शिवसेनेने या बॅनरवर म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला तीन वेळा आमदार, तीन वर्षे मंत्री राहिलेला निष्क्रिय लोकप्रतिनिधीच विकासाचा खरा मारेकरी आहे, डोंबिवलीसाठी काय केलं ते सांगा?, तीन कामे तरी दाखवा, असं आवाहनच भाजपने शिवसेनेला दिलं आहे. हे आव्हान देताना बॅनरवर गाजराचा फोटो छापला आहे. पोलिसांनी केडीएमसीच्या मदतीने सर्व बॅनर तात्काळ काढून टाकले आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपमध्ये बॅनरबाजी सुरू झाल्याने डोंबिवलीकरांचं मात्र चांगलंच मनोरंजन होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या:

रेल्वे लगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन होणार?; जितेंद्र आव्हाडांनी केले प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

Kalyan Crime : टिटवाळ्यात जागेच्या वादातून प्राणघातक हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Kalyan Literary Conference : कल्याणमध्ये सातव्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन; परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलनाची रेलचेल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.