Kalyan News | देखभाल-दुरुस्तीचे काम करणार असल्याने कल्याण, उल्हासनगरमध्ये यावेळेत वीजपुरवठा होणार खंडित

कल्याण पश्चिम , शहाड ,उल्हासनगर विभाग एक, उल्हासनगर कँप ते पाच व चिखलोली एमआयडीसी, आयटीआय, अंबरनाथ मधील अनेक परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Kalyan News | देखभाल-दुरुस्तीचे काम करणार असल्याने  कल्याण, उल्हासनगरमध्ये यावेळेत वीजपुरवठा होणार खंडित
light
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:16 AM

कल्याण : महापारेषणच्या (Kalyan News) पडघा ते मोहने या अति अतिउच्च दाब वाहिनीवर आज सकाळी सात ते दुपारी एकच्या दरम्यान अत्यंत तातडीचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. परिणामी या वाहिनीवरून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या काही भागाचा वीजपुरवठा त्यामुळे बंद राहणार आहे. संबंधित ग्राहकांनी (Ulhasnagar news) सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. यात कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल, सिनेमॅक्स परिसर, बिर्ला कॉलेज रोड, सह्याद्री नगर, उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) परिसर, योगीधाम, गौरीपाडा आणि शहाड भागाचा वीजपुरवठा बाधित होणार आहे. उन्हाळ्यात वीज पुरवठा बंद (Power off) राहणार असल्यामुळे त्याचा नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागणार, पण दुपारी १ वाजेपर्यंत लाईट येईल असंही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

उल्हासनगरमधील या भागात बत्ती गुल

उल्हासनगर एक विभागातील मोहन सबर्बिया, मुरलीधर नगर, केमीकल झोन, वडळगाव, जसानी, लालचक्की, स्टेशनरोड, भाजी मार्केट, मातोश्रीनगर, जुने मुनिसिपल कौन्सिल, मोरीवली व चिखलोली एमआयडीसी, आयटीआय, अंबरनाथ पाणीपुरवठा, लालचक्की मराठा सेक्शन, ओटी सेक्शन, कृष्णानगर, झेडपी हिल, मिरची वाडी, दीपकनगर, नवरे पार्क, ईश्वर रेसिडेन्सी, मुरलीधरनगर, गणेशनगर, नवीन भेंडीपाडा, भास्करनगर, कामगार पुतळा, बुवापाडा, घाडगेनगर, खुंटवली, बालाजीनगर, शिवलींगनगर, न्यु कॉलनी, मातोश्रीनगर, मोहन फेज 1, 2 व 4, विठ्ठल मंदिर, अष्टविनायक कॉलनी, स्वामीनगर, लक्ष्मीनगर, कैलासनगर, पनवेलकर ग्रीन सिटी, शिवाजीनगर या भागाचा वीजपुरवठा सकाळी 7 ते दुपारी 1 दरम्यान बंद राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

या भागात सकाळी 9 ते 4 वीजपुरवठा बंद राहणार

याशिवाय उल्हासनगर एक विभागातील खेमानी, पंजाबी कॉलनी, सुभाषनगर, आजादनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिरा चौक, सेंट्रल हॉस्पिटल, फॉलोअर लाईन, डालडा डेपो, प्रेस बाजार, नेवी कॉलनी, गजानन मार्केट, सीरू चौक, नेहरू चौक, कामगार हॉस्पिटल, बेफिकरी चौक, अवतराम चौक, गरीबनगर, सोनार गल्ली, फर्निचर मार्केट, मयूर हॉटेल, जुना ओटी, झुलेलाल मंदिर, बरॅक ६२८, दुर्गामाता मंदिर, रमाबाईनगर, भैय्यासाहेबनगर, हनुमाननगर, आजादनगर, राणा ट्रेडिंग भाग, महादेव कंपाऊंड, गणेश कंपाऊंड, अग्रवाल कंपाऊंड आदी भागाचा वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.