किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते प्रताप सरनाईक (Pratap sirnaik) यांच्या भष्ट्राचाराचे आरोप केल्यावर आता सरनाईकांनी सोमय्यांवर (Kirit somaiyya) पलटवार केला आहे. किरीट सोमय्या माजी खासदार झालेले आहेत ते कुठेही काहीही जाऊन बडबडत बसतात, असा टोला त्यांनी लगावला आहे. 11 कोटी दंड एकदा सांगतात, अठरा कोटी दंड एकदा सांगतात, 21 कोटी दंड एकदा सांगतात, माझे किरीट सोमय्यांना आव्हान आहे. लोढांनी शाळा बनवून दिली होती, त्यांनी ती परत महापालिकेकडून टीडीआर घेऊन परत चालवायला घेतली आहे आणि हिरानंदानी ज्वलंत उदाहरण आहे. त्यांच्यावर 13 कोटीचा दंड लावण्यात आला आहे, मग त्यांच्या मागे का नाही लागत? हिरानंदानींचे लोढांचे, रुस्तमजी, कल्पतरू यांच्याशी तुमचे लागेबांधे आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.
सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे
सोमय्या खोटे आरोप करत आहेत, मी त्यांना न्यायालयात आव्हान केले आहे, तीस दिवसात माफी मागितली नाही दिलगिरी व्यक्त केले नाही तर त्यांच्यावर 100 कोटीचा दावा ठोकाणार, असेही ते म्हणाले. 2007 पासून विहंग सोसायटीसाठी तत्कालीनआयुक्त आरे राजू यांच्या विरोधात लढत होतो, त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला म्हणून जाता जाता विहंग गार्डन ही इमारत अधिकृत असताना तिचा तांत्रिक दृष्टीचा मुद्दा ग्राह्य धरून तीन कोटी रुपयांचा दंड लावला होता आणि ओ सी अडकवली होती नऊ वर्षापासून राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो पण नवीन सरकारच्या काळामध्ये या इमारतीला इमारत अनधिकृत नसल्याचं ठरवण्यात आला दंड माफ करण्याचा तोच निर्णय नव्हता पण निर्णय महा विकास आघाडी सरकारनामा मंत्रिमंडळ बैठकीत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला, असेही सरनाईकांनी सांगितले.
भाजपच्या वाटेवर जायची गरज नाही
शिवसेनेने मला पहिल्यांदा काही नसताना 2009 ला तिकीट दिलं 2014ला मी पुन्हा मी निवडून आलो. 2019 साली नवव्या क्रमांकावर सर्वाधिक मतं घेऊन मी निवडून आलो. शिवसेनेने मला एवढं दिलं त्यामुळे त्याच्या वाटेवर जायचं त्याच्या वाटेवर जायची गरज नाही, असेही त्यांनी बजवाले आहे. शिवसेनेचा निष्ठावान आमदार म्हणून अरुण गोस्वामी असू द्या किंवा कंगना राणावत असू द्या त्यांच्या विरोधात बोलताना मला टार्गेट केलं गेलं, त्यामुळे माझ्या अनेक चौकशा झाल्या, असा आरोपही त्यांनी केला आहे.