मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बुलडोझर बाबा’ असं कुणी म्हटलं?

Pratap Sarnaik Poster For CM Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाण्यात ठिकठिकाणी पोस्टर लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ हे पोस्टर लावण्यात आलेले आहेत. अनधिकृत बार आणि पबवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर हे पोस्टर लावण्यात आले आहेत. वाचा सविस्तर...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुलडोझर बाबा' असं कुणी म्हटलं?
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यात पोस्टरImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 11:30 AM

ठाण्यात ठिकठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरची जोरदार चर्चा होतेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी करण्यात आली आहे. अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. ‘महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा’ असा मजकूर असणारे पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावले आहेत.

सरनाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुणे नंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनधिकृत हुक्का पार्लर, पब आणि बारवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘ड्रग माफियांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा’ असं या पोस्टरवर म्हणण्यात आलं आहे. जनता आपल्या सोबत अशीच कारवाई करत राहा, अशा आशयाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहेत.

पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्जची विक्री केली जात असल्याचं समोर आलं. याचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली. पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीरा भाईंदरमधील देखील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महानगरपालिकेकडून अनधिकृत बार आणि पब वर कारवाई करण्यात आली.

पोस्टरवर नेमकं काय?

अनधिकृत बारवरच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आल आहे. या पोस्टरवर ‘ड्रग माफीयांचा कर्दनकाळ, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा’ अशी मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे. तर जनता आपल्या पाठीशी आहे. अशीच कारवाई करत राहा, असा संदेश या पोस्टरवर लिहिलेला आहे. या मजकुराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या हातात हातोडा आहे. तर त्यांच्या मागे बुलडोझर आहे. या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.