उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?

एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. (pravin darekar slams uddhav thackeray over ranked among top five most popular cm's in india)

उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?
प्रवीण दरेकर, विधानपरिषद विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 1:54 PM

ठाणे: एका वृत्तसंस्थेने देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात टॉप फाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान मिळाले आहे. त्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. हा सर्व्हे कुणी केला? त्यांना काय अॅथोरिटी आहे? कशाच्या आधारावर सर्व्हे केला? असे सवाल प्रविण दरेकर यांनी केले आहेत. (pravin darekar slams uddhav thackeray over ranked among top five most popular cm’s in india)

ठाण्यातील कोव्हिड हॉस्पिटलने 500 कर्मचाऱ्यांना कामावरून अचानक काढून टाकले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रविण दरेकर आले होते. यावेळी त्यांनी हा सवाल केला. सर्व्हे करणाऱ्यांना कसलीही अॅथोरिटी नाही. एखादी संस्था सर्व्हे करते तेव्हा ती कशाच्या आधारावर करते? त्याबाबत आम्ही खोलात जात नाही. जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे. जन आशीर्वाद यात्रेद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठी जनता आहे हे दिसून येत आहे. हाच आमचा सर्व्हे आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. तेव्हा हजारोंच्या संख्येने लोक जमले. फडणवीस यांनी पूर काळात मोठं काम केलं होतं. लोक त्याची आठवण करत होते. फडणवीस हेच आपल्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असंही लोक म्हणत होते. आमच्यासाठी हेच महत्त्वाचे आहे, असं सांगतानाच एखाद्या संस्था किंवा चॅनेलचा सर्व्हे हा काही अॅथोराईज निर्णय होऊ शकत नाही, अशी टीका त्यांनी केली.

यात्रा अयशस्वी करण्याचा डाव

जन आशीर्वाद यात्रेतील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आमची यात्रा अयशस्वी करण्यासाठीच गुन्हे दाखल केले जात आहेत. मोदींना आशीर्वाद देण्यासाठी लोक रॅलीत येत आहेत. त्यांना कोणीही बोलावत नाही. सरकारचे कार्यक्रम होतात. त्याला गर्दी होते. ती चालते. फक्त आमच्या कार्यक्रमांकडे बोट दाखवले जात आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी या सरकारची रित आहे, अशी टीका त्यांनी केली. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात 7 ते 8 हजार लोकांची गर्दी झाली होती. जालना, नाशिक, बीड या ठिकाणी झालेल्या सरकारी पक्षांच्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. त्यांनी गर्दीचे कार्यक्रम केलेले चालतात, फक्त आम्हालाच नियम का दाखवले जातात?, असा सवालही त्यांनी केला.

वाईन शॉपच्या रांगा चालतात, मंदिराच्या का नाही?

मंदिर सुरू करावे ही आमचीही मागणी आहे. त्याच्यावर अनेक लोकांचे रोजगार अवलंबून आहेत. या सर्वांचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे. नियमाच्या चौकटीत हवं तर मंदिरे उघडा, पण मंदिरे उघडली पाहिजेत, असं सांगतानाच एकीकडे डान्सबार, वाईन शॉप सुरू आहे. तिथे रांगा चालतात. फक्त मंदिराच्या रांगा चालत नाहीत. मंत्रालयात दारुच्या बाटल्या सापडतात. त्याही चालतात. मंत्रालयाचे मदिरालय करायला हे सरकार निघालं आहे. पण मंदिरे चालू करत नाही. सरकार नक्की काय निर्णय घेतं हेच कळायला मार्ग नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

औकातीनुसार बोला

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही त्यांनी कानपिचक्या दिल्या. पटोले यांनी आधी स्वत:ची उंची वाढवावी. केवळ शारीरिक उंची वाढवून चालणार नाही. तर वैचारिक उंचीही वाढली पाहिजे. मोदींवर टीका करण्या इतपत आपलं कर्तृत्व नाही आणि तशी क्षमताही निर्माण केलेली नाही. त्यामुळे क्षमतेनुसार आणि औकातीनुसारच बोलावे, अशी टीका त्यांनी पटोलेंवर केली आहे. (pravin darekar slams uddhav thackeray over ranked among top five most popular cm’s in india)

संबंधित बातम्या:

जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका

महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले

तुम्ही तुमचे इतिहासकार बोलवा, आम्ही आमचे अभ्यासक बोलावू, होऊन जाऊ द्या आमना-सामना, संभाजी ब्रिगेडचं राज ठाकरेंना ओपन चॅलेंज!

(pravin darekar slams uddhav thackeray over ranked among top five most popular cm’s in india)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.