Raj Thackeray Thane News: आमचा साईनाथ त्यावेळेस, ज्या नेत्यामुळे राज ठाकरेंनी हटवलं, त्याच्यावर वसंत मोरेंची भरसभेत स्तुतीसुमनं
राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसे नेत्यांची भाषणं झाली. त्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते मनसे नेते वसंत मोरे (Vasant More MNS) यांचं भाषण. कारण राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर वसंत मोरेंची नाराजी उघडपणे बाहेर आली होती.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray Thane Speech) आज पुन्हा ठाण्यात भव्य सभा घेत रान पटेवलं. त्यांनी भाषणाला सुरूवात करतानाच फायर ब्रिगेडच्या गाडीचा उल्लेख करत केला. मात्र राज ठाकरेंच्या भाषणाआधी मनसे नेत्यांची भाषणं झाली. त्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते मनसे नेते वसंत मोरे (Vasant More MNS) यांचं भाषण. कारण राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या भाषणानंतर वसंत मोरेंची नाराजी उघडपणे बाहेर आली होती. त्यानंतर मात्र मनसेने वसंत मोरेंना पुणे मनसे अध्यक्षपदावरून हटवलं आणि त्यांच्या जागी साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची पुण्याचे मनसे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. राज ठाकरेंनी मशीदीबाबत घेतलेली भूमिका आणि त्यानंतर सुरू झालेला वाद सर्वांना माहित आहे. माझ्या प्रभागात सर्वात जास्त मुस्लिम मतदार आहे, मी राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देऊ हे मलाच कळेना म्हणूत, वसंत मोरेंनी त्यावेळी उघड नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर मनसेने ही कारवाई केली. मात्र ज्या साईनाथ बाबर यांच्या हातात वसंत मोरेंना हटवून पुण्याची मदार सोपवली. त्या साईनाथ बाबर यांच्यावर राज ठाकरे यांनी जोरदार स्तुतीसुमनं उधळली आहेत.
कोरोनाकाळात बाबत यांनी चागलं काम केलं
पुण्यात कोरोनाकाळात मनसेने जी कामं कली ते सांगताना वसंत मोरे यांनी राज ठाकरेंचं भरभरून कौतुक केलं. मी आणि साईनाथ आम्ही दोन नगरसेवक आहे महापालिकेत, आमच्या ब्लू प्रिंटने काय विकास केलाय पहायचा असेल तर कात्रज आणि कोंढव्यात या मग तुम्हाला दाखवतो. भाजपचे शंभर नगरसेवक आहेत. तरी चर्चेतला पुरस्कार मनसेच्या नगरसेवकाला जातो, तर आम्ही नक्कीच काम केलंय. कोरोनाकाळात आमचा साईनाथ 5-5 हजार लोकांना जेवण देत होता. आम्ही दवाखाने उभे केले, असे म्हणत त्यांनी साईनाथ बाबर यांचं कौतुक केलं आहे.
गाडी फोडल्याचा आवाज महाराष्ट्राने ऐकला
पुण्यात कोरोना काळात सरकारच्या माध्यमातून जी काम होणं अपेक्षित होतं ती कामं झाली नाहीत, असेही ते म्हणाले. कोरोनाकाळात फक्त मनसे काम करत होती. तुम्ही त्या गोष्टी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. सगळे नेते आपल्या घरात बसलेले असताना मनसे पदाधिकारी रस्त्यावर होते, तेव्हा एक एम्बेसेडरची काच फुटली आणि त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्राने ऐकला, असे त्यांनी फोडलेल्या गाडीबाबतही सांगितलं आहे. तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथे आमचा मनसैनिक जात होता. सरकार जी कामं करत नव्हते ती कामं आम्ही करत होतो, असेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितलं आहे.
Vasant More Speech : आतापर्यंत कितीवेळा वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आलेत? जाणून घ्या!