Ramdas Athwale : उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर कुठेतरी दसरा मेळावा घ्यावा, शिंदेंची सेनाच खरी; आठवलेंचा शिवसेनेला टोला

एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंची बाजू घेत आठवले यांनी शिवसेनेला टोले लगावले. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

Ramdas Athwale : उद्धव ठाकरेंनी बीकेसी किंवा इतर कुठेतरी दसरा मेळावा घ्यावा, शिंदेंची सेनाच खरी; आठवलेंचा शिवसेनेला टोला
रामदास आठवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 2:52 PM

ठाणे : खरी शिवसेना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचीच आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यास त्यांनाच परवानगी मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी बीकेसी किंवा इतर ठिकाणी कुठेही दसरा मेळावा घ्यायला हरकत नाही, असा टोला रिपाइंचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी लगावला आहे. कल्याणमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता ते बोलत होते. मेजॉरिटीची शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने त्यांना परवानगी द्यावी, असे मुंबई महानगरपालिकेला (BMC) उद्देशून ते म्हणाले. रिक्षा चालकांनी शिवसेना वाढवलेली आहे. त्यांचा अपमान करणे हे योग्य नाही, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंची बाजू घेत आठवले यांनी शिवसेनेला टोले लगावले. राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

‘आपला तोटा होण्याची शक्यता’

मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. राज ठाकरेंना घेतले तर भाजपाचे नुकसान होऊ शकते. उत्तर भारतीयांची मते आहेत, गुजराती मते आहेत, दक्षिण भारतीय नागरिकांची मते आहेत. ही मते आपल्याला मिळणार नाहीत, त्यामुळे आपला तोटा होण्याची शक्यता आहे. मनसेला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सोबत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही, कारण रिपब्लिकन पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपासोबत आहे, असे आठवले म्हणाले.

‘मागील वेळी 82 जागा आणल्या, यावेळी…’

मागीलवेळी भाजपा आणि आरपीआय एकत्र असताना 82 जागी निवडून आणल्या. त्यामुळे मेजॉरिटीपैकी 114 जागा निवडून आणण्यामध्ये आपल्याला काही अडचणी येणार नाहीत, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

‘राज ठाकरे यांनी मेळावा घ्यावा’

कुठली तरी जागा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेळावा घ्यावा. सगळ्यांना मेळावा घेण्याचा अधिकार आहे. आमचा मेळावा आम्ही घेतला असता. मात्र आमचा मेळावा नागपूरमध्ये असतो. नाहीतर आम्ही मुंबईमध्ये दसरा मेळावा घेतला असता. त्यांनी घ्यायला काहीही हरकत नाही. बघू कोणाचा मेळावा मोठा होईल, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.