Kalyan Crime : मनसे आमदारांनी भडकवल्यामुळे शेतकऱ्याने खोटी तक्रार दिली, शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा आरोप
3 फेब्रुवारीच्या रात्री मोकाशी पाडा येथील जमिनीच्या वादातून शेतकरी एकनाथ मोकाशी यांच्या कुटुंबांवर हल्ला करण्यात आला. जमीन घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह शेतकरी कुटुंबियांवर हल्ला केला गेला होता असा आरोप शेतकरी कुटुंबियांनी केला होता.
कल्याण : कोणालाही आमच्याकडून मारहाण करण्यात आली नाही. शेतकरी कुटुंबाला आमदारांनी भडकवले. आमदारांचे काम विकास कामे करणे आहे. लोकांची भांडणे मिटविणे आहे, अशी टीका शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre) यांनी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्यावर केली आहे. तर माझा मतदार संघ आहे. माझा लोकांवर अन्याय होत असताना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पोलिसांवर दबाव टाकू नये तर मी आमदार कसा ? मी शेतकरी कुटुंबाच्या पाठीशी आहे, असे प्रत्युत्तर मनसे आमदार राजू पाटील यांनी दिले आहे. 3 फेब्रुवारीच्या रात्री मोकाशी पाडा येथील जमिनीच्या वादातून शेतकरी एकनाथ मोकाशी यांच्या कुटुंबांवर हल्ला करण्यात आला. जमीन घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह शेतकरी कुटुंबियांवर हल्ला केला गेला होता असा आरोप शेतकरी कुटुंबियांनी केला होता. (Reaction of former Shiv Sena corporator Ramesh Mhatre in the case of beating of farmers in Kalyan)
या प्रकरणात पोलिस तक्रार घेत नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी डायघर पोलिस ठाण्यात मोकाशी कुटुंबियासह सहा तास ठिय्या दिला होता. अखेर पोलिसांनी चार दिवसांनी म्हात्रे यांच्यासह 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र म्हात्रे याच्या चालकाच्या तक्रारीनुसार शेतकरी कुटुंबीयावर देखील पोलिसांनी गुन्हा दाखल
रमेश मात्रे यांच्याकडून मनसे आमदारावर हल्ला बोल
या प्रकरणात जवळपास सात दिवसानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात खुलासा करताना सांगितले की, आमच्याकडून कोणाला मारहाण करण्यात आली नाही. जे जखमी झाले, ते कशामुळे जखमी झाले हे आम्हाला माहित नाही. मात्र आजी माजीनी भडकविल्याने शेतकरी खोटे बोलताय आणि पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिली आहे. मनसे आमदाराने सहा तास ठिय्या दिला. त्यांच्या मदतीला शिवसेनेचे माजी आमदार गेले. आमदारांचे काम विकास काम करणे. लोकांचे भांडण मिटविणे असते. असे कृत्य करणे ही त्यांची कामे नाही. लोकांनी त्यांना निवडून दिले आहे. त्यांनी चांगली कामे करावीत. असा हल्लाबोल म्हात्रे यांनी केला आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांचे प्रत्युत्तर
मनसे आमदार राजू पाटील यांनी रमेश म्हात्रे यांच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या लोकांवर अन्याय होत असेल तरी पोलिस गुन्हा दाखल करीत नसतील तर मी दबाव टाकू नये तर मी आमदार कसला ? असा सवाल पाटील यांनी केला आहे. मी शंभर टक्के पीडित शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. जागेमध्ये कोणाचा काय फायदा आहे. हे मला माहिती नाही. केवळ शेतकरी कुटुंबीयांवर अन्याय झाला. त्यांच्या मदतीला गेलो. मी कोणाचं नाव पण घेतले नाही. इतका गंभीर गुन्हा दाखल असताना ते प्रेस घेत आहेत. उद्या त्यांचा गुन्हा पण कमी केला जाईल. पिडीत शेतकरी कुटुंबाला कायदेशीर मदत लागल्यास मी करणार आहे, असे राजू पाटील म्हणाले. (Reaction of former Shiv Sena corporator Ramesh Mhatre in the case of beating of farmers in Kalyan)
इतर बातम्या