Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने रुग्णालयाकडून रुग्णाला डिस्चार्ज देण्यास नकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा ठिय्या

उपचारानंतर हॉस्पिटलने बिल पाठविले. ते पाहून अजय यादव हे हैराण झाले. खाजगी रुग्णालयने अजय यांना एक लाख 20 हजार रुपयांचे बिल पाठविले. इतके पैसे अजय यांच्याकडे नसल्याने हॉस्पिटल त्यांच्या आईला डिस्चार्ज देत नव्हते.

Kalyan : बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने रुग्णालयाकडून रुग्णाला डिस्चार्ज देण्यास नकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा ठिय्या
बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने रुग्णालयाकडून रुग्णाला डिस्चार्ज देण्यास नकार
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 12:58 AM

कल्याण : शासकीय हॉस्पिटलमधील डॉक्टरने एका महिलेला उपचार करण्यासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये पाठविले होते. मात्र त्या खाजगी हॉस्पिटल (Private Hospital)ने अव्वाच्या सव्वा बिल लावल्याने रुग्णाचे नातेवाईक हैराण झाले. 12 दिवसांपासून हॉस्पिटल रुग्णाला सोडत नाही आहे. नातेवाईकांकडे बिल (Bill) भरण्यासाठी पैसे नाही. ही परिस्थिती ऐकताच सामाजिक कार्यकर्त्यां (Social Worker)नी थेट महापालिका मुख्यालय गाठले. आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. अखेर आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हॉस्पिटलला रुग्णास सोडण्यास सांगितले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (Refusal to discharge the patient from the hospital due to lack of money to pay the bill)

रुग्णालयाने 1 लाख 20 हजार बिल लावले

कल्याणमध्ये राहणारे अजय यादव यांची वयोवृद्ध आई शिवमूर्ती यांना किडनी स्टोनचा त्रास असल्याने अजय यांनी आईला कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉक्टरांनी महिलेची तपासणी केली. त्या ठिकाणच्या डॉक्टरांनी या ठिकाणी उपचार होऊ शकत नाही. मी सुचविलेल्या हॉस्पिटलमध्ये जा. या आजारावर त्याठिकाणी उपचार होईल. जेव्हा अजयने विचारले की, उपचाराचा खर्च किती येईल. तेव्हा डॉक्टरने 35 ते 40 हजार रुपये लागतील, असे सांगितले होते.

उपचारानंतर हॉस्पिटलने बिल पाठविले. ते पाहून अजय यादव हे हैराण झाले. खाजगी रुग्णालयने अजय यांना एक लाख 20 हजार रुपयांचे बिल पाठविले. इतके पैसे अजय यांच्याकडे नसल्याने हॉस्पिटल त्यांच्या आईला डिस्चार्ज देत नव्हते. याविषयीची माहिती समाजिक कार्यकर्ते शैलेश तिवारी, राहुल काटकर आणि अन्य जणांना मिळताच त्यांनी अजयला सोबत घेऊन थेट महापालिकेच्या मुख्य वै द्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांचे दालन गाठले. त्यांच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलन सुरु केले. संबंधित डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या विरोधात कारवाईची मागणी केली.

मुख्य वैद्यकीय अधिकारी काय म्हणाल्या?

या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल. सध्या रुग्णाला मुंबईला हलविण्यात येईल. ज्या डॉक्टरवर आरोप आहे, ते आमच्या पॅनलवरील डॉक्टर आहेत. ते शासकीय डॉक्टर नाहीत. फक्त ओपिडीसाठी ते हॉस्पिटलमध्ये येतात, असे मुख्य वैद्यकीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी सांगितले. (Refusal to discharge the patient from the hospital due to lack of money to pay the bill)

इतर बातम्या

TMC : ठामपा अधिकार्‍यांना माहिती अधिकाराचे वावडे, माहिती नाकारणार्‍या सुमारे 21 अधिकार्‍यांना दंड

Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.