कल्याणसाठी आनंदाची बातमी, तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त, शाळाही सुरू
कोरोना संसर्गाबाबत कल्याण ग्रामीणसाठी आनंदाची बातमी आहे. कल्याण तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत.
कल्याण : कोरोना संसर्गाबाबत कल्याण ग्रामीणसाठी आनंदाची बातमी आहे. कल्याण तालुक्यातील 46 पैकी 36 ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचं दिसत आहे. गेल्या 6 दिवसात या ग्रामपंचायतीमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या खबरदारीमुळे आणि सर्तकतेमुळे हे शक्य झाले आहे (Relief for Kalyan about Corona 36 villages are Covid 19 free).
राज्यात कल्याण डोंबिवली एकेकाळी हॉटस्पॉट होता. कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपास लागून असलेल्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. दुसऱ्या लाटेत संपूर्ण ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले. कल्याण तालुक्यात एकूण 46 ग्रामपंचायती आहेत. कल्याण तालुका आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी भारत मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने कोरोना रोखण्यासाठी चांगलीच खबरदारी घेतली.
कोरोनामुक्तीसाठी काय उपाययोजना केल्या?
कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनीही कोरोना रोखण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कोरोनाचे रुग्ण शोध घेण्यासाठी अॅण्टीजेन आणि आरटीपीसीआर टेस्टींगवर भर दिला गेला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी शिक्षक, अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका यांची मदत घेतली गेली. कंटेनमेंट झोनवर विशेष लक्ष दिले गेले. कल्याण तालुक्यातील काही ठिकाणी कोविड सेंटर सुरु केले गेले. त्यामुळे कोरोना रुग्ण उपचारासाठी मदत झाली.
कोरोना चाचणी आणि लसीकरणावरही भर
आत्तापर्यंत 18 ते 44 वयोगटातील 3 हजार 651 जणांना कोरोनाची लस दिली आहे. 45 वर्ष पुढील वयोगटातील 17 हजार नागरीकांना लस दिली आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी 500 ते 700 अॅण्टीजेन टेस्ट केल्या जात आहेत. जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यापैकी रेवती हे गाव आहे. या गावात शाळा देखील सुरु झाली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन शिक्षक कमी विद्यार्थी बोलावून शिक्षणाचे धडे देत आहेत.
हेही वाचा :
PHOTO | ना गणवेश, ना फळा, करमाळ्यात चक्क पिंपळाच्या झाडाखाली भरते शाळा
Ganeshotsav 2021 | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा, मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या, 8 जुलैपासून बुकिंग
बेकायदेशीपणे जमाव जमवून रॅली काढली, संभाजी भिडेंसह 80 धारकऱ्यांवर गुन्हा दाखल
व्हिडीओ पाहा :
Relief for Kalyan about Corona 36 villages are Covid 19 free