Dombivali Crime: स्कूटीला कट मारली म्हणून रिक्षाचालकास मारहाण, दोघा पिस्तुलधारी आरोपींना अटक
डोंबिवलीच्या शेलारनाका परिसरात 12 डिसेंबर रोजी स्कूटी चालक सिद्धार्थ मोरे रस्त्यावरून जात असताना एका रिक्षा चालकाने त्याला कट मारली. या दोघांचा कट मारण्यावरून वाद झाला. या वादानंतर राजेश भालेराव हा आपली रिक्षा घेऊन शेलरनाका परिसरात असलेल्या रिक्षा स्टँडवर पोहचला.
डोंबिवली : स्कूटी चालकाला कट मारली म्हणून एका रिक्षाचालकास काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीच्या शेलारनाका परिसरात घडली होती. आता या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. मारहाण करणारे तरुण पिस्टल घेऊन आले होते. मारहाण दरम्यान बंदुकीची गोळी पोलिसांना सापडल्यामुळे या बाबतचा खुलासा झाला. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
स्कूटीला कट मारली म्हणून रिक्षाचालकाला मारहाण
डोंबिवलीच्या शेलारनाका परिसरात 12 डिसेंबर रोजी स्कूटी चालक सिद्धार्थ मोरे रस्त्यावरून जात असताना एका रिक्षा चालकाने त्याला कट मारली. या दोघांचा कट मारण्यावरून वाद झाला. या वादानंतर राजेश भालेराव हा आपली रिक्षा घेऊन शेलरनाका परिसरात असलेल्या रिक्षा स्टँडवर पोहचला. काही वेळातच सिद्धार्थ मोरे आपल्या काही साथीदारांसोबत त्या ठिकाणी पोहचला. आणि त्याने रिक्षाचालक राजेश भालेराव यास बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती जो मध्यस्तीसाठी आला होता. त्यालासुद्धा मारहाण करण्यात आली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.
घटनास्थळी बंदुकीची जिवंत गोळी सापडली
डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. मात्र या प्रकरणात मोठा खुलासा तेव्हा झाला जेव्हा रामनगर पोलीस पंचनाम्यासाठी घटनास्थळी पोहचले आणि त्या ठिकाणी त्यांना बंदुकीची एक जिवंत गोळी सापडली. पोलीस देखील हैराण झाले. पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने पिस्टल हस्तगत केली आहे. यातील आरोपी सिद्धार्थ मोरे आणि अमोल केदार यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी ही पिस्तुल कुठून आणली, याचा पोलीस तपास करीत आहेत. (Rickshaw driver beaten for hitting Scooty in Dombivli)
इतर बातम्या