‘फोगाटचं पदक काढलं पण विश्वगुरूचा…’; संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनल सामन्याआधी तिचं वजन जास्त भरल्याने तिला अपात्र करण्यात आलं. याचाच धागा पकडत उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात आपल्या भाषणातून शिंदे सरकारवही निशाणा साधला.

'फोगाटचं पदक काढलं पण विश्वगुरूचा...'; संजय राऊतांचा PM मोदींवर निशाणा
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 9:46 PM

कोण हे मोदी, म्हणे विश्वगुरू. फोगाटचं पदक काढलं. पण विश्वगुरूचा आवाज आला नाही. उद्धव साहेबांना सांगतो, पॅरिसच्या ऑलिम्पिकला 117 खेळाडू गेले आहेत. त्यात हरियाणा, अरुणाचल आणि महाराष्ट्राचे मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात महाराष्ट्राला अधिक पद, गुजरातचे फक्त दोघे आहेत. स्पोर्ट्सचा सर्वाधिक फंड 469 कोटी फक्त गुजरातला दिला आहे. दोन खेळाडूंसाठी, खेळात आणि सैन्यात कधी गुजरात नाही त्यात महाराष्ट्र आहे. देशासाठी बलिदान करणं हा महाराष्ट्राचा धंदा आहे आणि आम्ही तो करणार. आमच्यावर तोतये सोडणार असाल तर आम्ही त्याच भूमीत हे तोतये गाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार आहे. तोतयांचं सरकार आहे. इतिहासातही तोतये खूप झाले होते त्यांचेही पाळेमुळे ठाण्यात असल्याचं संजय राऊत म्हणाले.

मला कुणी तरी विचारलं क्या चाहते है लोक. मी म्हटलं लोक म्हणतात शेख हसीना सारखं यांना पळवून लावा. मी म्हटलं आम्ही इतके क्रुर नाही. आम्ही त्यांचा निवडणुकीत पराभूत करू, आम्ही 180 पेक्षा जास्त जागा जिंकू. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व राज्याला हवा. लोक म्हणतात तुमचा फेस कोण? मी म्हटलं, ज्यांनी पाच वर्षात दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तो फेस म्हणजे उद्धव ठाकरे. आमचा फेस एकच. या महाराष्ट्राला ठाकऱ्यांच्या चेहऱ्याशिवाय बाकी सर्व मुखवटे लावून फिरत आहेत. मुखवटा यांचा आणि चेहरा अब्दालीचा खाली दाढी वर मुखवटा, असं म्हणत संजय राऊत यांनी खोचक टीका केली.

ज्या ठाण्याने हिंदुहृदय सम्राटांना पहिला राजकीय विजय मिळवून दिला त्या शिवसेनेचं ठाणं आहे. त्या ठाण्याने उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत केलं आहे. अख्ख्या महाराष्ट्रात भगवा सप्ताह सुरू आहे. त्यानिमित्ताने काम सुरू आहे. हा भगवा सप्ताह काल ठाण्यात व्हायला पाहिजे होता. काल नागपंचमी होते. ज्या सापांना या ठाण्यात इतकी वर्ष दूध पाजलं अगदी हिंदुहृदय सम्राट, धर्मवीर आनंद दिघे आणि उद्धव ठाकरे तुम्ही या सापांना दूध पाजलं त्या सापांचे फणे ठेचण्यासाठी आम्ही कालच आलो असतो. लोकसभेत या सापांच्या शेपट्या वळवळत राहिल्या. विधानसभेत त्यांच्या शेपट्या ठेचल्याशिवाय राहणार नसल्याचं म्हणत महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.