Raut on Somaiya: भाजपच्याच लोकांना कोर्टाचे दिलासे कसे मिळतात?; संजय राऊत यांचा सवाल
Raut on Somaiya: गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का?
ठाणे: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यावर सवाल केले आहेत. गेल्या काही काळापासून भाजपच्या लोकांना दिलासा मिळत आहे. दिशा सालियन, मुंबई बॉम्ब प्रकरण ते विक्रांत घोटाळा (ins vikrant) करणाऱ्या आरोपींपर्यंत एका रांगेत सर्वांना दिलासे कसे मिळतात? न्यायव्यवस्थेवर कुणाचा दबाव आहे? न्याय व्यवस्थेत विशेष असे लोकं दिलासा देण्यासाठी बसवले आहेत का? ते कुणाच्या सूचनेने काम करत आहेत का? असा सवाल करतानाच विशिष्ठ राजकीय पक्षाच्या, विशिष्ठ विचारसरणीच्या लोकांनाच न्याय मिळावा यासाठी न्याय यंत्रणा काम करतात. हे असंच सुरू राहिलं तर देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था धोक्यात येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचे उजवे हात आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांची बातमी वाचत होतो. जळगावची बातमी होती. मी त्यांना ओळखत नाही. ज्या गोष्टी पोलीस आणि प्रशासनाकडून करून घेऊ शकत नाही, त्या आम्ही न्यायालयाकडून करून घेतो. न्यायालयात आमचं वजन आहे. असं कुटे म्हणाले. कोणत्या प्रकारचं वजन आहे हे काल परवा दिसलं असेलच, असा टोला राऊत यांनी लगावला.
राजभवनाच्या कागदावर गुन्हा दाखल
भाजप नेते किरीट सोमय्या आंज पत्रकार परिषद घेऊन घोटाळे काढणार आहेत. त्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले असता, सरकार पडत नाही. पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही. त्या वैफल्यातून आरोप केले जात आहेत. 58 कोटीचा घोटाळा झाला आहे. तो पैसा कुठे गेला? न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी असली तरी त्या पट्टीला छिद्र पडलं आहे. त्यातून ते आपल्या विचाराच्या लोकांकडे पाहत आहेत. तुम्ही किती हल्ले केले, फुसके बार केले तरी काही होणार नाही. सत्र न्यायालयाने तुम्हाला प्रश्न विचारले आहे. ते काय मुर्ख आहेत का? त्यांनाही मानाचं स्थान आहे. तेही न्यायाचं स्थान आहे. त्यांनी तुमच्यावर बेईमानीचा ठपका ठेवला आहे. पैसे गोळा केले त्याचा हिशोब तुम्ही दिला नाही. राजभवन सांगतं पैसे जमा झाले नाहीत. अजून कसला पुरावा हवा आहे? बातमीच्या कात्रणावर गुन्हा दाखल झाला नाही. राजभवनाने जो कागद दिला आहे. त्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आज सोमय्या बॉम्ब टाकणार
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेऊन आघाडीतील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहेत. आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर किरीट सोमय्या आज पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे सोमय्या आज काय बॉम्ब टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या: