अल्पवयीन भावा-बहिणीचा लैंगिक छळ, प्रियकर-प्रेयसीच्या विकृत चाळ्यांनी कल्याण हादरले

एक 23 वर्षीय तरुणी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. ही तरुणी पिडीत मुलाची नातेवाईक आहे. ही तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले.

अल्पवयीन भावा-बहिणीचा लैंगिक छळ, प्रियकर-प्रेयसीच्या विकृत चाळ्यांनी कल्याण हादरले
अल्पवयीन भावा-बहिणीचा लैंगिक छळ
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 9:53 PM

कल्याण : कल्याणमध्ये विकृतीची कळस गाठल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका प्रेयसी आणि तिच्या प्रियकराकडून अल्पवयीन भावंडांवर लैंगिक अत्याचार केल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे. प्रेयसीने 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला तर तिच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी प्रियकर-प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

एक 23 वर्षीय तरुणी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. ही तरुणी पिडीत मुलाची नातेवाईक आहे. ही तरुणी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने आपल्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. या आरोपी तरुणीने मुलाच्या बहिणीला सांगितले की आपण दोघी मिळून तिच्या प्रियकरासोबत सुद्धा शय्या करायची. अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ

हल्ली लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. त्यात अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत आहेत. कल्याण डोंबिवलीतही लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. पोलिसांनी या घटनेत कायदेशीर कारवाई केली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन तरुणीवर 33 जणांनी बलात्कार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सर्व आरोपीना अटक केली होती. डोंबिवलीतील ही घटना ताजी असताना लैंगिक विकृतीची एक विचित्र घटना कल्याणमध्ये समोर आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भावा बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत.

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, आमच्याकडे दोन वेगवेगळया तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येणार आहे. पिडीत आणि आरोपी हे नातेवाईक असल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Sexual abuse of minor siblings by boyfriend-girlfriend)

इतर बातम्या

केवढे हे क्रौर्य…देवाघरच्या फुलावर कट्यारीचे वार, नाशिकमध्ये 4 वर्षांची मुलगी गंभीर जखमी, लॉकेट हिसकावण्याचा प्रयत्न

धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या सराईत चोरटा डोंबिवली आरपीएफ पोलिसांच्या जाळ्यात

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.