Naresh Mhaske | तुम्ही कुणा-कुणाची चा**?, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नरेश म्हस्के यांची जीभ घसरली
उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली. ठाकरेंच्या या टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांची जीभ घसरली आहे.
ठाणे | राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गट विरुद्ध शिंदेंची शिवसेना या दोन्ही गटात दररोज खडाजंगी पाहायला मिळेतय. दररोज या दोन्ही गटांकडून एकमेकांवर विविध आरोप-प्रत्यारोप आणि सडकून टीका केली जाते. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (4 एप्रिल) पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लाचार, फडतूस आणि लाळघोटे असा उल्लेख करत जहरी टीका केली. या टीकेला उत्तर देताना शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांची जीभ घसरली आहे. “तुम्ही फडणवीस यांना जर लाळघोटे म्हणता, मग तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये कुणा-कुणाची चाटली”, असं नरेश म्हस्के म्हणाले.
नरेश म्हस्के काय म्हणाले?
“कुणाला लाळघोटे म्हणता? तुम्हाला मुख्यमंत्री होण्याकरता आम्ही शिवसेना-भाजप म्हणून एकत्र निवडून आलो. लोकांसमोर नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला. शिवसेना-भाजप युती म्हणून मतं मागतिली आणि आपण त्यांना लाळघोटे म्हणता. आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणा कुणाची चाटलीत मुख्यमंत्री होण्यासाठी, याचं सुद्ध उत्तर तुम्ही दिलं पाहिजे”, असं म्हणत म्हस्के यांनी ठाकरेंवर जहरी टीका केली.
“तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचे आभार मानायला हवेत. कारण यापूर्वी तुम्ही मी आणि माझे कुटुंब, मी आणि माझे घर,मी आणि माझं परिवार. या दोघांमुळे ( शिंदे-फडणवीस) हे दोघे काम करतायेत. त्यामुळे तुम्ही रस्त्यावर उतरला आहेत.नाहीतर तुम्ही कुटुंबाच्या बाहेर जात नव्हतात. मी आणि माझं घर आणि माझी तिच जबाबदारी, अशा शब्दात म्हस्केंनी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
“फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार आणि लाळघोटे करणारा, उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदाराने हल्ला केला तरीही काही हालचाल नाही. फडतूस गृहमंत्र्यांला पदावर राहण्याचा अधिकार नाही. यांच्या घरावर काही आलं की एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटका केल्या जातात. मात्र त्यांच्या पक्षावर मिंधे गटाकडून काही झालं,तर तिथे काही करायची यांची हिंमत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.