शिवसेनेच्या आमदार, महापौरांचा डम्पिंगविरोधात ठिय्या, पालिकेपासून राज्यापर्यंत सत्ता असतानाही आंदोलन

उल्हासनगरातील कॅम्प 5 भागात असलेल्या डम्पिंगच्या विरोधात शिवसेनेनं आज रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता आहे. (ulhasnagar municipal corporation)

शिवसेनेच्या आमदार, महापौरांचा डम्पिंगविरोधात ठिय्या, पालिकेपासून राज्यापर्यंत सत्ता असतानाही आंदोलन
ulhasnagar municipal corporation
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 3:44 PM

उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प 5 भागात असलेल्या डम्पिंगच्या विरोधात शिवसेनेनं आज रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केलं. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेचीच सत्ता आहे. तसेच राज्यातही शिवसेनेचीच सत्ता आहे. तरीही शिवसेनेवर डम्पिंगविरोधात आंदोलन करण्याची वेळ आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असूनही शिवसेनेला रस्त्यात बसून आंदोलन करण्याची वेळ आली. (shiv sena mla and mayor agitation against dumping ground in ulhasnagar)

उल्हासनगरच्या कॅम्प 5 मधील आकाश कॉलनी परिसरात एका बंद पडलेल्या खदानीत उल्हासनगर महापालिकेनं तात्पुरत्या स्वरgपात डम्पिंग सुरू केलं आहे. या डम्पिंगचा स्थानिकांना मोठा त्रास होतो. कचऱ्याच्या सतत जाणाऱ्या गाड्या, त्यातून सांडत असलेला कचरा, पावसाळ्यात होणारा चिखल, त्यासोबत डम्पिंगमधून वाहून येणारा कचरा या सगळ्यामुळे या भागातले नागरिक त्रासले आहेत. दुसरीकडे उल्हासनगर महापालिकेला मलंगगड पट्ट्यातील उसाटणे गावाजवळ 30 एकर जागा डम्पिंगसाठी मोफत देण्यात आलीये. मात्र तिथे डम्पिंग न उभारता अजूनही शहरातलं डम्पिंग सुरू ठेवल्याबद्दल शिवसेनेनं महापालिका प्रशासनाचा निषेध केला.

आमदार, महापौरांचा ठिय्या

या डम्पिंग विरोधात आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई आशान यांच्यासह शिवसेनेचे सगळे पदाधिकारी डम्पिंगच्या परिसरात रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करायला बसले. महापालिकेनं उसाटणे डम्पिंगबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही कचऱ्याची एकही गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला. विशेष म्हणजे उल्हासनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे, ज्या भागात हे डम्पिंग आहे तिथे शिवसनेचे आमदार आहेत, खासदारही शिवसेनेचे आहेत, पालकमंत्री आणि मुख्यमंत्री हेदेखील शिवसेनेचेच आहेत. शिवाय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगरविकास खातं सुद्धा आहे. तरी सुद्धा आयुक्त ऐकत नसल्यानं शिवसेनेला आंदोलन करावं लागणं, हा विनोद म्हणावा की शोकांतिका? अशी चर्चा शहरात रंगली आहे.

(shiv sena mla and mayor agitation against dumping ground in ulhasnagar)

संबंधित बातम्या:

केंद्रीय मंत्रीपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार, कपिल पाटलांची ठाणेकरांना ग्वाही

ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांवरुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

थोर तुझे उपकार, घरकाम करुन वाढवलं, मुलाने पांग फेडलं, 50 व्या वाढदिवशी आईला अनोखं गिफ्ट

(shiv sena mla and mayor agitation against dumping ground in ulhasnagar)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.