Ambernath Theft : अंबरनाथमध्ये चोरी आणि घरफोडीच्या दोन गुन्ह्यांची उकल, चोरट्याला पोलिसांकडून बेड्या
अंबरनाथच्या जुने अंबरनाथ गाव, धर्माजी कॉलनी परिसरात हा चोरटा चोऱ्या करत होता. या भागात राहणाऱ्या चंद्रपाल मौर्या यांच्या घरी त्याने 27 जून 2020 च्या रात्री चोरी करून 76 हजार 100 रुपयांची रोकड चोरली होती. तर याच भागात राहणाऱ्या अब्रार शाह याच्या घरून त्याने 4 मार्च 2022 च्या रात्री दोन मोबाईल चोरून नेले होते. तसेच 2020 साली चंद्रपाल मौर्या यांच्या घरी केलेल्या चोरीचीही कबुली त्याने दिली.
अंबरनाथ : रात्रीच्या वेळी स्वतःच्याच परिसरात फिरून चोऱ्या करणाऱ्या एका चोरट्या (Thief)ला अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. देवप्रकाश राय असे त्याचे नाव असून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन मोबाईलसह 40 हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत. एका मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात राय याचा माग काढत पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिस चौकशीत त्याने चोरीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली. (Shivajinagar police arrested a thief in Ambernath)
आरोपीकडून चोरीच्या घटनांची उकल
अंबरनाथच्या जुने अंबरनाथ गाव, धर्माजी कॉलनी परिसरात हा चोरटा चोऱ्या करत होता. या भागात राहणाऱ्या चंद्रपाल मौर्या यांच्या घरी त्याने 27 जून 2020 च्या रात्री चोरी करून 76 हजार 100 रुपयांची रोकड चोरली होती. तर याच भागात राहणाऱ्या अब्रार शाह याच्या घरून त्याने 4 मार्च 2022 च्या रात्री दोन मोबाईल चोरून नेले होते. तसेच 2020 साली चंद्रपाल मौर्या यांच्या घरी केलेल्या चोरीचीही कबुली त्याने दिली. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेल्या 2 मोबाईल फोनसह 40 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी दिली आहे.
पुण्यात मोबाईल आणि लॅपटॉप चोरटे अटकेत
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाईल फोन आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील दोन चोरांना अटक करत चोरीचे 30 मोबाईल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. या आरोपींवर विविध पोलिस ठाण्यात चोरीचे 10 गुन्हे दाखल आहेत. सौंदाराजन गोविंदा आणि बालाजी सल्लापुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे. (Shivajinagar police arrested a thief in Ambernath)
इतर बातम्या
Yavatmal Murder : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Bhandara Suicide : पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या