Special Lecture Series : चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

| Updated on: Mar 04, 2022 | 11:31 PM

यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळविण्याकरीता आपण आपल्या आयुष्यात कशा पध्दतीने मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर इथे पर्यंतचा खडतर प्रवास केलेला आहे, याबाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. सदर कार्यक्रमाला युपीएससी एमपीएससीचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. अभिजित सावंत यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्नउत्तराच्या माध्यमातून संवाद साधला व मार्गदर्शन केले.

Special Lecture Series : चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन
चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन
Follow us on

ठाणे : केंद्रीय लोकसेवा आयोग (MPSC) व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक पद्धतीने अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल असा ठाम विश्वास राष्ट्रीय तपास संस्था, जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. शैलेंद्र मिश्रा (भापोसे) यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानमालेत ते बोलत होते. या व्याख्यानमालेस ठाणे व मुंबई शहरातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या निर्देशानुसार दिनांक 3 मार्च, 2022 रोजी ठाणे शहरातील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता यूपीएससीसाठी ” सामान्य अध्ययनातील भूगोल विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोन” या विषयाबाबत अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे (AGMUT), राष्ट्रीय तपास संस्था, जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. शैलेंद्र मिश्रा(भापोसे) यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. (Special lecture series organized by Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute)

यूपीएससी परीक्षेची तयारी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी कशा पध्दतीने करावी तसेच परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांबाबत कशा पध्दतीने विचार करावा व त्याअनुषंगाने कशा पध्दतीने अचूक उत्तरे लिहावीत, सामान्य अध्ययन व CSAT यांची तयारी कशा पध्दतीने करावी तसेच परीक्षेत यशस्वी होण्याकरीता कोणत्या गोष्टी कराव्यात अगर करु नयेत आदी बाबत अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश केडरचे (AGMUT ), राष्ट्रीय तपास संस्था, जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉ. शैलेंद्र मिश्रा (भापोसे) यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. तसेच यूपीएससीच्या परीक्षेत यश मिळविण्याकरीता आपण आपल्या आयुष्यात कशा पध्दतीने मेहनत, चिकाटी व जिद्दीच्या जोरावर इथे पर्यंतचा खडतर प्रवास केलेला आहे, याबाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांशी दिलखुलासपणे संवाद साधला. सदर कार्यक्रमाला युपीएससी एमपीएससीचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. अभिजित सावंत यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांशी प्रश्नउत्तराच्या माध्यमातून संवाद साधला व मार्गदर्शन केले.

ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदिप माळवी, उप आयुक्त मनिष जोशी व संचालक महादेव जगताप, तज्ज्ञ प्रशिक्षक प्रा. मुझ्झामील यांच्या मार्गदर्शनाखाली हे विशेष व्याख्यान यशस्वीरीत्या पार पाडणेकरीता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी / कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली असून संस्थेचे गिरीश झेंडे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (Special lecture series organized by Chintamanrao Deshmukh Administrative Training Institute)

इतर बातम्या

TMC Corporator : ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, उद्यापासून प्रशासकीय राजवट सुरू

Devendra Fadanvis : खऱ्या आरोपींना शोधा अन्यथा भाजप पोलीस ठाण्याला घेराव करणार, देवेंद्र फडणवीसांचा सत्ताधारी आणि पोलिसांना इशारा