Thane : मालमत्ता करात दिलेल्या मुदतवाढ सवलतीस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा

मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कर चांगला तयार झाला आहे. गेल्यावर्षी मालमत्ता कर जमा करताना अधिकाऱ्यांनी दमछाक झाली होती. त्यातचं कोरोनाचं सावट असल्याने अनेकांनी दुर्लक्ष केलं होतं.

Thane : मालमत्ता करात दिलेल्या मुदतवाढ सवलतीस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा
मालमत्ता करात दिलेल्या मुदतवाढ सवलतीस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 12:23 PM

ठाणे : ठाणेकर (Thane) करदात्यांना पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर भरणेकरिता प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांनी 16 जून ते 15 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीचा फायदा ठाणेकरांनी घेतला असून जुलै 2022 अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. यापुर्वी पालिकेचा कर जमा करताना अधिकाऱ्यांना अधिक कसरत करावी लागत होती. तसेच आगोदर कर जमा करणाऱ्या करदात्यांनी पालिकेकडून (TMC) सवलत देखील जाहीर करण्यात आली होती. 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाल्याने अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

यावर्षी मालमत्ता कराकरिता 770 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट

मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी 15 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यत 4% सवलत देण्यात आली होती. या सवलतीस दिलेल्या मुदतवाढीस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून जुलै 2022 अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे, या कालावधीत मागील वर्षी 260 कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. यावर्षी मालमत्ता कराकरिता 770 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून चार महिन्यातच त्यापैकी 45 टक्के वसुली म्हणजेच 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे.

हे सुद्धा वाचा

4% सवलत दिल्याने लवकर मालमत्ता कर जमा

मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कर चांगला तयार झाला आहे. गेल्यावर्षी मालमत्ता कर जमा करताना अधिकाऱ्यांनी दमछाक झाली होती. त्यातचं कोरोनाचं सावट असल्याने अनेकांनी दुर्लक्ष केलं होतं. कारण मागच्या दोन वर्षात देशातील सगळा कारभार टप्प होता. त्यामुळे गेल्यावर्षी कमी मालमत्ता कर जमा झाला होता. सध्या अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. 15 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यत 4% सवलत दिल्याने लवकर मालमत्ता कर जमा झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.