Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण

डोंबिवलीत राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने ता तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. मात्र 2019 पासून त्यांच्यात खटके उडू लागले. अशातच दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला.

Dombivali Crime : डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा, प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाण
प्रेमसंबंधातून स्पोर्ट्स कोचकडून विद्यार्थिनीला अमानुष मारहाणImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 4:24 PM

डोंबिवली : सुसंस्कृत डोंबिवलीत गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका स्पोर्ट्स प्रशिक्षकाने त्याच्या विद्यार्थिनीवर अत्याचार (Abused) करत अमानुष मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. या प्रशिक्षकाला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रामेश्वर पाठक असे अटक करण्यात आलेल्या प्रशिक्षकाचे नाव आहे. पीडिता आणि रामेश्वर यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते. दोघांमध्ये सतत खटके उडत असत. यातून आरोपी पीडितेला मारहाण करायचा. मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक विरोधात बलात्कार, गंभीर मारहाण यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करत अटक केली. (sports coach abused and beat up a student over a love affair in dombivali)

मारहाण करत ब्लॅकमेलही करायचा

डोंबिवलीत राहणारी 27 वर्षीय पीडित तरुणी 2012 साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा कोच असलेल्या रामेश्वर पाठक याने ता तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. मात्र 2019 पासून त्यांच्यात खटके उडू लागले. अशातच दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला. या तरुणीला रामेश्वर याने 18 मार्च 2022 रोजी डोंबिवलीत रॉडने अमानुष मारहाण केली, ज्यात या तरुणीचा पाय फ्रॅक्चर झाला. इतक्यावरच न थांबता त्याने या तरुणीवर अत्याचारही केला. तसेच तुझे अर्धनग्न फोटो माझ्याकडे असून ते व्हायरल करेन, अशी धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. अखेर या तरुणीने एका सहकाऱ्याच्या मदतीने मानपाडा पोलीस ठाण्यात येऊन याबाबतची तक्रार दिली. यानंतर मानपाडा पोलिसांनी रामेश्वर पाठक याला अटक केली. (sports coach abused and beat up a student over a love affair in dombivali)

इतर बातम्या

नाशिकमध्ये कारसाठी विवाहितेचा छळ; मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ, पती सैन्य दलात

Gadchiroli Crime | अहेरीत जवानाने गोळ्या झाडून स्वत:ला संपविले; माजी पालकमंत्र्यांच्या घरासमोरील घटनेने खळबळ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.