Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Liqour : ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध गोवा मद्यावर कारवाई, एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त

हे मद्य घेऊन जाण्यासाठी विशिष्ट प्रकारची बॉक्‍स पॅकिंग करण्यात आली होती. गोवा येथून विविध प्रकारची उच्च प्रतीची दारू गुजरात येथे घेऊन जाण्यात येत असताना हे मद्य सहजासहजी आढळून येऊ नये यासाठी हे संपूर्ण मद्य लिक्विड सोप असलेल्या बॉक्समध्ये विशिष्ट प्रकारच्या पॅकिंगमधून गुजरातकडे नेण्यात येत होते.

Thane Liqour : ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध गोवा मद्यावर कारवाई, एकूण 55 लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध गोवा मद्यावर कारवाईImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 4:44 PM

ठाणे : ठाणे उत्पादन शुल्क विभागाकडून ठाण्यातून गुजरातकडे जाणाऱ्या अवैद्य मद्य (Liqour) गाडीवर कारवाई करण्यात आली आहे. गोवा येथून गुजरातकडे मोठ्या संख्येने अवैध गोवा मद्य घेऊन जाण्यात येत होते. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील भिवंडी चिंचोटी मार्गावर या ट्रकचा पाठलाग करत अवैध मद्य जप्त (Siezed) करत कारवाई केली आहे. या कारवाईत चालकाला ताब्यात घेऊन एकूण 55 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मुद्देमालात एकूण 27 प्रकारचे वेगवेगळे उच्च प्रतीचे अवैद्ध गोवा मद्य सापडले आहे. (State Excise Department cracks down on illegal Goa liquor in Thane)

गोव्यातून गुजरातमध्ये नेण्यात येते होते मद्य

हे मद्य घेऊन जाण्यासाठी विशिष्ट प्रकारची बॉक्‍स पॅकिंग करण्यात आली होती. गोवा येथून विविध प्रकारची उच्च प्रतीची दारू गुजरात येथे घेऊन जाण्यात येत असताना हे मद्य सहजासहजी आढळून येऊ नये यासाठी हे संपूर्ण मद्य लिक्विड सोप असलेल्या बॉक्समध्ये विशिष्ट प्रकारच्या पॅकिंगमधून गुजरातकडे नेण्यात येत होते. या दरम्यान भिवंडी चिंचोटी मार्गावर गाडीचा पाठलाग करून चालकाला ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाकडे या आरोपीची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे. तर यामागच्या मुख्य सूत्रधाराला शोधण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग करत असून यामागे मोठी टोळी असल्याचा संशय देखील यावेळी राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधिक्षक निलेश सांगळे यांनी यावेळी सांगितले. (State Excise Department cracks down on illegal Goa liquor in Thane)

इतर बातम्या

Badlapur Murder CCTV : टेबलाला धक्का लागला म्हणून तरुणाची हत्या! 8 ते 10 जणांकडून जाईपर्यंत मारहाण

13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली, बचावलेल्या महिलेने सांगितली अपघाताची सत्यता

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.