Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

या कारखान्यांवर धाड टाकल्यानंतर साडेतीन लाख रुपयांचे बनावट बॉटल कॅप व हे कॅप्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाखो रुपयांचे एकूण पाच मोठे यंत्र कारखान्यात सापडून आले. या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर याच कंपनीच्या संलग्न आणखी 2 कारखान्यांवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे.

Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 11:53 PM

ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट या परिसरात अवैद्य बनावट मद्य निर्मितीकरीता बॉटलचे झाकण (Bottle Caps) बनवणाऱ्या कारखान्यावर व राज्य उत्पादन शुल्क विभागा (State Excise Department)ने धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत अकरा आरोपींसह 40 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात अवैद्य मद्य निर्मितीकरीता बनावट पद्धतीचे बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कारखान्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच या कारखान्यावर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. (State Excise Department takes action against companies manufacturing counterfeit liquor bottle caps)

कंपनीच्या संलग्न आणखी 2 कारखान्यांवरही धाड

या कारखान्यांवर धाड टाकल्यानंतर साडेतीन लाख रुपयांचे बनावट बॉटल कॅप व हे कॅप्स बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाखो रुपयांचे एकूण पाच मोठे यंत्र कारखान्यात सापडून आले. या कारखान्यावर धाड टाकल्यानंतर याच कंपनीच्या संलग्न आणखी 2 कारखान्यांवर धाड टाकत पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी हे बनावट पद्धतीचे कॅप्स येथे तयार करून कानपूर येथे पाठवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे कॅप बनावट मद्याच्या बॉटलसाठी वापरण्यात येतात. या धाडीत 11 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली. तर यामागे मोठी टोळी असल्याचा संशय देखील यावेळी अधीक्षक निलेश सांगाडे यांनी व्यक्त केला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाची खरेदी विक्री उघड

नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूखंडाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीने तब्बल 186 खरेदी विक्रीचे व्यवहार बनावट कागदपत्रे वापरत करण्यात आल्याचे उघड झाले आहे. तुकडेबंदीच्या आदेशानंतर अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करत हे खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्याचे या चौकशीत उघड झालेय. यात नांदेडमधले अनेक भूखंड माफिया आणि बड्या बिल्डरचा समावेश आहे. या प्रकरणी केलेल्या चौकशीच्या अहवालानंतर आता या भूखंड माफियांवर गुन्हे दाखल होणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करत खरेदी विक्रीचे व्यवहार करणाऱ्या माफियांत खळबळ उडाली आहे. (State Excise Department takes action against companies manufacturing counterfeit liquor bottle caps)

इतर बातम्या

Akola Crime : अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक

Kalyan Crime : घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.