सुषमा अंधारे यांची शाब्दिक फटकेबाजी, शिंदे गटातील कोणाकोणावर रोष?
हिंदुत्वासाठी एकमेकांना सांभाळला पाहिजे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
संदेश शिर्के, Tv9 मराठी, प्रतिनिधी, ठाणे : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे या आज मिरा भाईंदर येथे होत्या. यावेळी त्यांनी चांगलीच फटकेबाजी केली. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार नरेंद्र मेहता,आमदार गीता जैन, चित्रा वाघ यांच्यावर शाब्दिक फटके लगावले. नरेंद्र मेहता हिंदुत्वासाठी जीव देणारा एक नंबर माणूस आहे. तर आमच्या प्रताप दादाला काय केला पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
जर नरेंद्र मेहताला जागा पाहिजे तो सरनाईकला आपल्या मतदारसंघ हसत हसत दिला पाहिजे. नाही तर कसला हिंदू? हिंदुत्वासाठी एकमेकांना सांभाळला पाहिजे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.
मी ऐकलं कोणाला आत ठेवायचं. कोणाला बाहेर ठेवायचं. हे बरोबर नाही. तुम्ही एकाच घराचं तर कसाला भांडायचं. आमच्या एकनाथ भाऊ मोठा भाऊ. कुटुंब प्रमुख म्हणून दोघांना सांभाळून घ्याचं. सरनाईकला आत आणि मेहताला बाहेर ठेवायचं. संगतीला सगळे पंगतीला बेगडे हे बरोबर नाही, असा घणाघातही सुषमा अंधारे यांनी केला.
यांना महिलांच्या सन्मान आहे का हो? कारण जर महिलांच्या सन्मान असता तर विधिमंडळात एकाक महिला पाहिजे होत्या. कमीत-कमी आमच्या चित्राताईला घेतलं पाहिजे होतं. चपला तुटल्या त्यांच्या.
आमच्या गीताताई त्या आशेने गेली. बघा यामिनी ताईवर किती धाडी पडल्या. किती पैसा सापडले. त्यांचं काही झालं नाही, तर गीताताई दोन-चार वर्षांनी अगरबती लावतात त्यांचं काय होणार, असा सवालही त्यांनी केला.
लक्षात घ्या हे सगळे आपल्या स्वार्थासाठी गेले यांनी जनतेशी विश्वासघात केली फक्त एका पक्षाशी नाही. मी तुम्हाला विचारते की राज्य कसं मिळते. तू उत्तर दिलं पाहिजे. खोटे बोलता आलं पाहिजे. रेटून बोलला आलं पाहिजे. पन्नास खोके घेता आलं. पाहिजे गुजरात आणि गुवाहाटी गेल्या जाता आलं पाहिजे.
आपल्या राज्यात काही दिसलं नाही तरी चालेल तिथे काय झाड काय डोंगर दिसलं पाहिजे. मिरा भाईंदरमध्ये महाप्रबोधन यात्रेच्या जाहीर मेळाव्याच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे यांनी शाब्दिक फटकेबाजी केली.