Kalyan Police Suicide : कल्याणमधील निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या
बदलापूरमध्ये राहणारे दिलीप सकपाळे हे कल्याण जीआरपीमध्ये कार्यरत होते. दिलीप हे दिवसरात्र दारुच्या नशेत बुडालेले असायचे. दारुच्या नशेत त्यांच्याकडून गैरवर्तन सुरु होते. तसेच सातत्याने ते ड्युटीवर गैरहजर असायचे. याच कारणातून त्यांना 15 दिवसांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
कल्याण : सेवेतून निलंबित (Suspended) केलेल्या पोलिस (Police) कर्मचाऱ्याने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. दिलीप सकपाळे (33) असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिस पुढील तपास करीत आहेत. दिलीप यांना दारुचे व्यसन होते. दिवसरात्र ते दारु पिऊन असायचे. याच कारणातून त्यांना 15 दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. सकपाळे यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी आहे. (Suspended police officer commits suicide under train in Kalyan)
निलंबनाच्या कारवाईनंतर पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या
बदलापूरमध्ये राहणारे दिलीप सकपाळे हे कल्याण जीआरपीमध्ये कार्यरत होते. दिलीप हे दिवसरात्र दारुच्या नशेत बुडालेले असायचे. दारुच्या नशेत त्यांच्याकडून गैरवर्तन सुरु होते. तसेच सातत्याने ते ड्युटीवर गैरहजर असायचे. याच कारणातून त्यांना 15 दिवसांपूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. यामुळेच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली. काल रात्री साडे आठच्या सुमारास कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे मार्गादरम्यान त्यांचा मृतदेह रेल्वे रुळालगत अप लाईनला आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दिलीप यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल करीत तपास सुरु केला आहे. एका निलंबित पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने पोलिस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
उल्हास नदीत उडी मारून रिक्षाचालकाची आत्महत्या
बदलापुरात एका तरुण रिक्षाचालकाने उल्हास नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली आहे. गुरुनाथ म्हात्रे असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. गुरुनाथ म्हात्रे हा याच भागातील वडवली गावात राहणारा आहे. बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरंजाडच्या उल्हास नदीच्या पुलाजवळ तो आला आणि रिक्षा रस्त्याच्या कडेला लावून थेट नदीत उडी मारली. हा प्रकार पाहून काही प्रत्यक्षदर्शींनी याची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला दिली. यानंतर अग्निशमन दलानं नदीत बोटीच्या साहाय्यानं गुरुनाथ म्हात्रे याचा शोध घेत त्याचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून त्याने आत्महत्या का केली? हे मात्र समजू शकलेलं नाही. या घटनेमुळे बदलापूरहून बारवी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. (Suspended police officer commits suicide under train in Kalyan)
इतर बातम्या
Crime | औरंगाबादेत मोठी कारवाई, बिडकीनमध्ये 37 लाखांचा गुटख्याचा साठा पकडला