“हे शिवसैनिक बाळासाहेब, दिघेसाहेबांसोबतच”; या नेत्याने उद्धव ठाकरे यांना शब्द दिला…

| Updated on: Apr 09, 2023 | 11:11 PM

ठाण्याचे शिवसैनिक हे वंदनीय बाळासाहेब ठाकर आणि दिघे साहेबांसोबत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत या दडपशाही विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला.

हे शिवसैनिक बाळासाहेब, दिघेसाहेबांसोबतच; या नेत्याने उद्धव ठाकरे यांना शब्द दिला...
Follow us on

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चालू असतानाच दुसरीकडे मात्र ज्या ठाण्यातील शाखेवर शिंदे गटाने दावा केला होता. त्याच ठाण्यात आज ठाकरे गटाच्या कार्यालयाचे हजारो कार्याकर्त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. त्यावरूनच शिंदे गटावर आज जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना त्यांनी त्या ठिकाणी महाआरती केली तर इकडे ठाण्यात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित ठाकरे गटाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आता पुन्हा एकदा कार्यालयावरून वाद पेटण्याची शक्यता दिसून येत आहे.

या शाखेचे उद्घाटन करतानाच ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांचे राजकारण म्हणजे दडपशाहीचे राजकारण चालू असल्याची टीका त्यांनी केली आहे.


केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, गेल्या 9 महिन्यांपासून ठाण्यात दडपशाहीचे राजकारण चालू आहे.

मात्र ज्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचे पाणी करून सर्वत्र शाखा बांधल्या आहेत त्या ठिकाणी पण त्यांची दडपशाहीचे राजकारण चालू असल्याचे टीका त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या बंडखोर आमदारांनी ठाकरे गटाने कितीही राजकारण केले तरीही त्यांनी योग्य वेळी त्यांना उत्तर देण्यात येईल.

सध्याच्या राजकारणात ज्या प्रमाणे दडपशाही चालू आहे. त्याला उत्तर देण्यात येईल. मात्र या दडपशाहीला न मानता लोकमान्यनगरात पुन्हा नव्या जोमाने शाखा सुरू झाल्याचेही केदार दिघे यांनी सांगितले.

ठाण्याचे शिवसैनिक हे वंदनीय बाळासाहेब ठाकर आणि दिघे साहेबांसोबत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीत या दडपशाही विरोधात आवाज उठविणार असल्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला.

दिघे साहेबांच्या मठात महाआरती ही झाली. त्या मठात दिघेसाहेबांनी लोकांची सेवा केली त्या ठिकाणी एखाद्या पक्षाचे नाव आणि व्यक्तीचे नाव लावणे हे खेदजनक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसैनिक आहे तिथेच आहेत. आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्यही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष केदार दिघे यांनी व्यक्त केले आहे.