Thakurli Bridge : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद

डोंबिवली पश्चिमेकडून येणारी व पूर्वेस ठाकुर्ली उड्डाणपुल मार्गे जाणाऱ्या वाहनांना बावन चाळ येथे वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे. डोंबिवली पश्चिमेकडून येणारी वाहने बावन चाळ येथून उजवे वळण घेऊन महात्मा गांधी रोड, डोंबिवली स्टेशन समोरून कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पुर्वेकडे जातील.

Thakurli Bridge : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद
डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 10:31 PM

ठाणे : डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या ठाकुर्ली (Thakurli) उड्डाणपुलावर वारंवार खड्डे पडत असल्याने या पुलाची दुरुस्ती मास्टीक अस्फाल्ट पद्धतीने केली जाणार आहे. या कामासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन दिवस बंद (Close) ठेवला जाणार आहे. या पुलावरील वाहतूक सोमवार 21 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 ते मंगळवार 22 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवला जाणार आहे. यामुळे वाहनचालकांनी डोंबिवली पूर्व पश्चिम प्रवास करण्यासाठी कोपर पुलाचा वापर करावा. दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस ठाकुर्ली पूल बंद ठेवला जाणार असून वाहनचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक पोलिसानी केलं आहे. (Thakurli flyover connecting Dombivali East to West closed for two days)

अशी असेल वाहतूक व्यवस्था

डोंबिवली पूर्वेकडील घरडा सर्कल आणि मंजुनाथ शाळेकडून येणाऱ्या वाहनांना जोशी हायस्कूलकडे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने घारडा सर्कल- मंजुनाथ मार्गे टिळक चौक, पाटणकर रोड, चार रस्ता मार्गे गिरनार चौक, म्हाळगी चौक, एस.के.पाटील चौकातून कोपर उड्डाणपूल मार्गे डोंबिवली पश्चिमेत जातील. ठाकुर्लीकडून जाणाऱ्या वाहनांना नाना कानविदे चौकात प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने नाना कानविंदे चौकातून फडके रोडने इंदिरा चौक मार्गे ग्रीन चौकातून उजवीकडे वळण घेऊन विष्णु शास्त्री चिपळुणकर रोडने वामन दिनकर जोशी चौकातून एस.के. पाटील चौक मार्गे कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पश्चिमेकडे जातील.

डोंबिवली पश्चिमेकडून येणारी व पूर्वेस ठाकुर्ली उड्डाणपुल मार्गे जाणाऱ्या वाहनांना बावन चाळ येथे वाहतुकीकरीता प्रवेश बंद करण्यात येत आहे. डोंबिवली पश्चिमेकडून येणारी वाहने बावन चाळ येथून उजवे वळण घेऊन महात्मा गांधी रोड, डोंबिवली स्टेशन समोरून कोपर उड्डाणपुलावरून डोंबिवली पुर्वेकडे जातील.

बिबट्याच्या ‘त्या’ बछड्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता

ठाणे जिल्ह्यातील गोरेगावमध्ये डोक्यात पाण्याची कॅन अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याची वनविभागाने सुटका केली होती. या बिबट्याला तीन दिवसांच्या उपचारांनंतर पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय. बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात पाण्याची कॅन अडकल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर जवळच्या गोरेगावमध्ये समोर आला होता. या बछड्याचा तब्बल 2 दिवस शोध घेत वनविभाग आणि प्राणीमित्र संघटनांनी 15 फेब्रुवारीला त्याला रेस्क्यू केलं होतं. यानंतर या बछड्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. तिथे तीन दिवस उपचार केल्यानंतर हा बिबट्याचा बछडा पूर्णपणे फिट झाला. यानंतर शुक्रवारी 18 फेब्रुवारीला त्याची पुन्हा एकदा नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आलीय. (Thakurli flyover connecting Dombivali East to West closed for two days)

इतर बातम्या

फडणवीसांसारख्या प्रगल्भ माणसाकडून ही अपेक्षा नाही; श्रेयवादाच्या टीकेला आव्हाडांचे प्रत्युत्तर

नेत्यांनो तुमच्या टाईमपासमुळे जनतेचे लाखो रूपये वाया, नरहरी झिरवळांनी कान उपटले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.